
सोमवार,२६ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष,दर्श-भावुका अमावास्या,शनैश्वर जयंती सोमवती अमावास्या.
तिथी-चतुर्दशी १२|१२
रास- मेष १३|४१ नं.वृषभ
नक्षत्र-भरणी ०८|२४
कृत्तिका २९|३३
योग-शोभन ०७|०२
अतिगंड २६|५५
करण-शकुनी
दिनविशेष-अमावास्या वर्ज्य
मेष - मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगावे असे वाटेल. आज जवळच्या व्यक्तींचा सहवास आवडेल. आपल्यामुळे कोण दुखावले जाणार नाही याची आज विशेष काळजी घ्यावी. दिवस आनंदी आहे.
वृषभ - बंधन योग दिसत आहेत. कधीकाळी केलेल्या चुकांचा आज त्रास सहन करावा लागेल. मनस्थिती ठीक राहण्यासाठी विशेष उपासना करावी लागेल. अमावस्या थोडी त्रासदायक ठरणार आहे.
मिथुन - पत्रव्यवहार मार्गी लागणार आहेत. शेजाऱ्यांच्या सहकार्याने पुढे जाल. नव्याने परिचय होतील. परदेशी वार्तालाप होतील. दिवस चांगला आहे.
कर्क - वाहनांची विशेष क्रेझ आज वाढेल. कामांमध्ये दिवस व्यस्त राहील. राजकारणामध्ये पुढाकार घ्याल. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल.
सिंह - आज भाऊका अमावस्या आहे. शनेश्वर जयंती. शनी उपासना आज विशेष फलदायी राहील. तीर्थक्षेत्रि भेटी द्यायला आवडेल. दानधर्मात दिवस व्यस्त राहील.
कन्या - केलेल्या गोष्टींचे कौतुक होणार नाही. एकटेपण जाणवेल. अति विचाराने फारसे काही हाती येणार नाही हे लक्षात घ्या. अचानक धनलाभाची मात्र शक्यता आहे.
तुळ -जोडीदाराच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. संसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालावे लागेल. प्रेमामध्ये चांगली उंची गाठाल. कोर्टात यश मिळेल.
वृश्चिक - शत्रू मध्ये वाढ होईल. अनेक गोष्टी एकाच वेळी करायला लागल्यामुळे तारांबळ उडेल. यश मिळवाल. नोकरीत बढती दिसते आहे.
धनु - आज शनेश्वर जयंती. शनी उपासना, सद्गुरु उपासना विशेष फलदायी ठरेल. शेअर्समध्ये, लॉटरीसाठी फायद्याचा दिवस आहे. स्वतः चा अभ्यास वाढवण्यासाठी प्रयत्न कराल.
मकर - शनि उपासना आज करावी. विशेष आपल्या राशीला फलदायी ठरेल. अमावस्या आहे पण घरातील कटकटी कमी होण्यासाठी एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्या. दिवस संमिश्र आहे.
कुंभ - शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर आहे. आज दानधर्मात दिवस घालवाल. जवळचे प्रवास होतील. अमावस्या वेगळे काहीतरी आयुष्यात घडवणार आहे. भावंड सौख्य चांगले आहे.
मीन - गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. सुवर्ण खरेदी होईल. गोडवाणीने इतरांना जिंकाल. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हाल. दिवस शुभ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.