Mangal Gochar: 11 मे पासून या राशींचे सुरु होणार अच्छे दिन; 45 दिवस मंगळ देणार शुभ परिणाम

Mars transit 2026: ११ मे रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करणार असून काही राशींना याचा मोठा फायदा होणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि सन्मानात वाढ होण्याचे संकेत आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे.
Mangal Gochar
Mangal Gocharsaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह सतत एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतात. त्यांच्या या भ्रमणाचा व्यक्तीच्या जीवनावर थेट परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह सोमवारी म्हणजेच ११ मे रोजी स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे.

मंगळ एका राशीत सुमारे ४५ दिवस राहतो. या वेळी मंगळाचं हे भ्रमण काही राशींसाठी विशेष असणार आहे. मेष, कर्क, कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात करिअर, धन, कुटुंब आणि सन्मान या बाबतीत शुभ संकेत मिळू शकतात. यावेळी कोणत्या राशींना या गोचरचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

Mangal Gochar
April Grah Gochar: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रहाचं गोचर; बुधादित्य राजयोग एका रात्रीत पालटणार नशीब

मेष

मेष राशीसाठी मंगळ पहिल्या घरात म्हणजेच लग्न स्थानात भ्रमण करणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमचे पैसे गुंतवण्याच्या संधी निर्माण होणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. यामुळे कौटुंबिक समस्या हळूहळू सुटणार आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि घरातील वातावरण शांततापूर्ण राहणार आहे. या काळात भाग्यदेखील तुम्हाला साथ देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एक विशेष काळ असेल.

Mangal Gochar
Mangal Gochar 2026: मंगळादित्य राजयोगामुळे उघडणार यशाचे दरवाजे, या राशींना मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

धनु

मंगळाचं हे गोचर धनु राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. जमीन, मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी हा विशेषतः चांगला काळ आहे. यावेळी जुने वाद मिटू शकतात आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. परदेशी व्यवसायातून नफा मिळण्याचे संकेत आहेत.

Mangal Gochar
Mangal Gochar 2026: मंगळादित्य राजयोगामुळे उघडणार यशाचे दरवाजे, या राशींना मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com