मेष : तुमच्यावर जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. दिवसभरात कोणत्याही कामात घाई करणे टाळा. सायंकाळच्या वेळेत निवांत व्हाल.
वृषभ : शांत राहणे फायद्याचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. नाते टिकवण्यासाठी संवाद महत्वाचा आहे.
मिथुन : मित्र किंवा सहकाऱ्याकडून सहकार्य मिळेल. किरकोळ खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी चांगली माहिती मिळू शकते.
कर्क : अतिविचार करमे टाळावे. जवळच्या व्यक्तीशी संवाद साधल्याने मन हलके होईल. भावुक न होता, व्यावहारिक विचार करा.
सिंह : रागावर नियंत्रण ठेवावे. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. बाहेरचे जेवण खाणे टाळा.
कन्या : आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे जुने काम पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. दिवसभरातील तणाव चांगल्याप्रकारे हाताळाल.
तुला : तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. दिवसभरात अतिवाचार करू नका. व्यायामासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. विनाकारण चिंता करण्याची गरज नाही. सायंकाळी फिरायला जावा.
धनु : कुटुंब किंवा पार्टनरच्या पाठिंब्याने मोठा निर्णय घ्याल. नवीन लोकांशी संवाद साधल्याने फायदा होईल. सकारात्मक विचार करा.
मकर : कामात सुधारणा होतील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. तेलकट पदार्थ टाळावेत.
कुंभ : खर्चावर नियंत्रण ठेवावा. पार्टनरसोबत सहलीला जाण्याचा विचार कराल. आर्थिक स्थिती सायंकाळपर्यंत सुधारेल.
मीन : आजचा दिवस क्रिएटिव्ह कामासाठी फायदेशीर राहील. हॉटेलमध्ये जेवण करणे टाळावे. आजपासून योगाभ्यास करणे फायदेशीर ठरेल.
Disclaimer : लेखातील संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.