Love Rashifal: पाच राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव; बायकोशी वाद की रोमांस, जाणून घ्या विवाहितांसाठी कसा असेल दिवस?

Love Horoscope 8 October 2025: बुधवारचा दिवस काहींसाठी चांगला असेल. अनेकांना काही त्रासही सहन करावा लागेल. जर तुम्हाला हा दिवस कसा जाईल हे जाणून घ्यायचे असेल.
Love Horoscope 8 October 2025:
Published On
Summary
  • पाच राशींसाठी प्रेम आणि रोमँसने भरलेला दिवस ठरणार आहे.

  • विवाहित जोडप्यांना जोडीदारासोबत चांगले क्षण व्यतीत करतील.

  • अश्विनी आणि भरणी नक्षत्रांच्या योगामुळे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

वैदिक पंचांगनुसार ८ ऑक्टोबर २०२५ ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील दुसरी आणि तिसरी तिथी असेल. यासोबतच अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र, हर्षन योग, वज्र योग, तैतिल करण, गर करण तयार होत आहे. दरम्यान आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घेऊ.

मेष

विवाहित मेष राशींसाठी हा दिवस खूप रोमँटिक असणार आहे. जोडीदारासोबत नातं घट्ट होईल. तुम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ शकता.

वृषभ

विवाहित वृषभ राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतील. तर अविवाहित व्यक्ती त्यांच्या भावंडांसोबत लांब पल्ल्याच्या सहलीची योजना बनवण्याची शक्यता.

मिथुन

विवाहित मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल. जोडीदार तुमच्याशी दयाळूपणे वागेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देईल.

Love Horoscope 8 October 2025:
Guru Gochar: दिवाळीपूर्वी गुरु करणार कर्क राशीत गोचर; 18 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

सिंह

सिंह राशीचे विवाहित लोकांना आजची संध्याकाळ तणावपूर्ण वाटेल, परंतु नंतर ते त्यांच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण शेअर करतील.

कन्या

विवाहित कन्या राशीच्या लोकांना बुधवारी संध्याकाळी त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची आणि जवळीक साधण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी ते घरातील कामांमध्ये व्यस्त असू राहू शकतील.

तूळ

तूळ राशीतील विवाहित लोकांना बुधवारी त्यांच्या जोडीदारासोबत आनंदी वाटेल. दिवस संपण्यापूर्वी ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे विवाहित लोक बुधवारी त्यांच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी खास प्लॅन तयार करतील. दोघेही या काळात एकमेंकांशी मनमोकळेपणाने बोलतील.

धनु

धनु राशीतील विवाहित लोक आपल्या जोडीदाराकडे विचित्र इच्छा व्यक्त करतील. त्यामुळे विवाहित जोडप्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीमधील विवाहित लोकांचा त्यांच्या जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मोठा वाद होऊ शकतो. वैयक्तिक समस्यांमुळे तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला जाण्यास नकार देऊ शकतात.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना वैयक्तिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यांचे त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. ते कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या हातून मोठी चूक होण्याची दाट शक्यता आहे.

मीन

विवाहित मीन राशीच्या लोकांना बुधवारी त्यांच्या प्रियकराकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. अविवाहित लोक आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला लग्नाची मागणी घालू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com