Love Rashifal: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे ५ राशींच्या लव्ह लाईफमध्ये येणार आनंदी आनंद

Love Rashifal: प्रेमासाठी मदत करणारा शुक्र ग्रह २७ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नक्षत्रात गोचर करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर पडणार आहे.
Love Rashifal: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे ५ राशींच्या लव्ह लाईफमध्ये येणार आनंदी आनंद
Love Rashifal
Published On

प्रेम एक सर्वात भारी अनुभवती आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम असते त्या व्यक्तीचं जीवन खूप भारी असते. ज्योतिष्य शास्रानुसार प्रत्येक व्यक्तीचं प्रेम जीवन कसे असेल. याची माहिती कुंडलीमध्ये प्रेम ग्रह शुक्राची स्थिती पाहून होऊ शकते. जेव्हा जेव्हा शुक्र नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा १२ राशींच्या प्रेम जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. पंचांगानुसार उद्या २७ ऑक्टोबर २०२४ ला शुक्र ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे.

मेष

विवाहित जातकांच्या प्रेम जीवनात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जुन्या कारणामुळे जोडप्यात वाद होण्याची शक्यता आहे. तर लव्ह रिलेशनशीपमध्ये असलेले लोक ट्रिपचा प्लान करू शकतात. शुभ रंग - हिरवा, शुभ अंक- ६

वृषभ

जे लोक रिलेशनशीपमध्ये आहेत त्यांच्या जोडीदाराकडून इच्छित गिफ्ट मिळू शकते, ज्यामुळे तो दिवस संस्मरणीय होईल. विवाहित जोडप्यांमध्ये त्यांच्या जोडीदाराकडून आयुष्यातील सर्वात चांगली बातमी मिळू शकते. शुभ रंग - गुलाबी, शुभ अंक- २

मिथुन

जे जातक रिलेशनशीपमध्ये आहेत, त्यांच्या प्रेमात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत खूप वेळ घालवण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांचा दिवस अविस्मरणीय होईल. काही जण त्यांच्या जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जातील. शुभ रंग - पांढरा, शुभ अंक -८

कर्क

अविवाहित लोकांचे नाते त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने ठरवले जाऊ शकते. जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचा पार्टनर त्यांना लग्नाबद्दल विचारू शकतो. याशिवाय विवाहित जोडप्यांचा दिवस प्रेम आणि रोमान्सच्या दृष्टीने पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत अनुकूल राहील. शुभ रंग - पर्पल, शुभ अंक - ४

सिंह

रिलेशनशीपमध्ये जे जातक आहेत, त्यांच्यासाठी दुखाचा दिवस असणार आहे. कारण त्यांच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याच्या प्लान रद्द होऊ शकतो. विवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळणार नाही, ज्यामुळे सिंह राशीचे लोक थोडे अस्वस्थ राहतील. शुभ रंग- आकाशी, शुभ अंक - ७

कन्या

विवाहित आणि रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांसाठी उद्याचा दिवस रोमांससाठी अनुकूल असेल. जुने वाद विसरून अनेकजण परत गप्पा करू लागतील. शुभ रंग- निळा, शुभ अंक - ९

तुळ

रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांनी मित्रापेक्षा जास्त आपल्या जोडीदाराला महत्त्व द्या. नाहीतर दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जे विवाहित आहेत त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणतीही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. अन्यथा याचा तुमच्या लव्ह लाईफवर नकारात्मक परिणाम होईल. शुभ रंग - काळा, शुभ अंक - ५

वृश्चिक

ज्या लोकांचं लग्न झालंय, त्या जोडप्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जे प्रेमसंबंधात आहेत त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल. शुभ रंग-नारंगी, शुभ अंक- ३

धनु

जर तुम्हाला कोणता मित्र आवडत असेल तर त्याला तुमच्या मनातील गोष्ट सांगून टाका. दुपारची वेळ त्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला उत्तर हे सकारात्मक येईल. शुभ रंग- गुलाबी, शुभ अंक १

मकर

विवाहित जातक आपल्या जोडीदारासोबत अधिकचा वेळ घालवू शकतील. ज्या दोघांमध्ये वाद आहे, त्यांचे भांडण मिटेल. शुभ रंग- लाल, शुभ अंक - ७

कुंभ

रिलेशनशीपमध्ये असलेल्यांनी आपल्या नात्यांचा शो ऑफ करू नये. नाहीतर तुमच्या पार्टनरशी तुमची लढाई होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत, विवाहित जोडप्यांसाठी उद्याचा दिवस चढ-उताराचा असेल.

शुभ रंग- नारिंगी, शुभ अंक - ४

मीन

नातेसंबंधातील लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत आनंददायी आणि गोड क्षण घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे मतभेद दूर होतील. विवाहित जोडपे डिनर डेटवर जाण्याचा विचार करू शकतात. शुभ रंग - तपकिरी, शुभ अंक ६

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com