Uttara Ashadha Nakshatra : धनु व मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्राची भूमिका आणि वैशिष्ट्ये

उत्तराषाढा नक्षत्र हे सूर्याच्या अधिपत्याखालील असून धनु व मकर राशीत विभागलेले आहे. या जातकांमध्ये महत्त्वाकांक्षा, प्रशासन कौशल्य, कलात्मक रस, तसेच आरोग्य व करिअरविषयी ठळक परिणाम दिसतात.
Uttara Ashadha Nakshatra
Vedic Astrologygoogle
Published On

उत्तराषाढा

रवी या ग्रहाच्या अंलाखाली येणारे हे नक्षत्र आहे. धनु राशी मध्ये एक चरण तर मकर राशी मध्ये तीन चरण येतात. या जातकांना चित्रकलेत रस असतो, स्वच्छ सुंदर कपड्यांची आवड असते. गृहकर्ता, अध्यक्ष असतात, प्रशासनामध्ये अधिकार मिळतात. महत्त्वाकांक्षी, उदार, परोपकारी, अशावादी, वक्तशीर, शिक्षणामध्ये रस घेऊन प्रावीण्य मिळवणारे असतात.

घरात वर्चस्व असते, घरात मानसन्मान बाहेर प्रतिष्ठा मिळते, कायद्याच्या चौकटीत कामे करण्याचा अट्टाहास असतो, समजूतदार, विश्वासू, काटकसरी, इच्छाशक्ती उत्तम, कुटनीती तज्ञ असतात. दोष शोधणाऱ्या असतात त्यामुळे लोकांच्या टीकेस पात्र ठरतात. शनिमुळे मकर राशीत त्या चरणाच्या व्यक्ति काहीसा विरोध होतो. योगी, आपलेच खरे करणारे, आळशी, दुसऱ्यांना नेहमी उपदेश करतात. त्यामुळे यांना लोक टाळतात. वडिलांचे सुख फारसे मिळत नाही किंवा वडील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. हट्टी, सरकारवर सतत टिका टिप्पणी करण्यात रस असतो. स्वतःच्या मताला चिकटून राहणे या लोकांना आवडते.

Uttara Ashadha Nakshatra
Thane Tourism : महाबळेश्वरपेक्षा सुंदर! ठाण्यापासून अवघ्या ६७ किमीवरचं Hidden हिल स्टेशन

नोकरी व्यवसाय

शरीर कमवून पहिलवान, शरीर सौष्ठव कमावणे, हत्ती पाळणारे, राजकीय पुढारी, बँक, वित्तीय विभाग, आयकर, शिपिंग विभाग, आंतरराष्ट्रीय व्यापार, पोर्ट ट्रस्ट, काही तांत्रिक संस्था, सरकारी आयुक्त, आयुर्वेद हॉस्पिटल, चर्मोद्योग, प्रकाशन संस्था, प्रशासन सेवा, गुप्तचर सेवा, शैक्षणिक संस्थांशी संबंध असून त्यात नोकरी करणे, काही ठिकाणी एजंटचे काम करण्याची सुद्धा संधी यांना मिळते.

रोग व आजार

गुडघे, मांड्या, रक्तवाहिन्या आणि शरीरातील नाड्या या नक्षत्रात येत असल्यामुळे - त्वचा विकार, हाड मोडणे, संधिवात, हृदयामध्ये रक्ताच्या गाठी, शीतपित्त, श्वासात अडथळे, नेत्र विकार आणि फुफुसाचे विकार हे रोग संभवतात.

Uttara Ashadha Nakshatra
Peacock Feather : मोरपंख भेट दिल्याने धनलाभ होतो का?

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com