Guru Gochar: कर्क राशीत गुरु ग्रह करणार गोचर; या ४ राशींचं भाग्य चमकणार, हाती येणार पैसा

Jupiter Transit 2026: २ जून २०२६ रोजी गुरू कर्क राशीत प्रवेश करणार असून याचा मेष, कर्क आणि कन्या राशींवर विशेष शुभ प्रभाव पडू शकतो. आर्थिक लाभ, करिअर प्रगती, मालमत्ता योग आणि भाग्यवृद्धीचे संकेत ज्योतिषशास्त्रात दिले आहेत.
Guru Gochar
Guru GocharSaam Tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरू गुरू हा सुख, भाग्य, संपत्ती, ज्ञान, शिक्षण आणि धर्माचा कारक मानला जातो. असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह बलवान स्थितीत असतो, त्या व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात.

ज्यावेळी गुरु त्याच्या राशीमध्ये बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. २ जून २०२६ रोजी गुरू चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Guru Gochar
Mangal Gochar: 11 मे पासून या राशींचे सुरु होणार अच्छे दिन; 45 दिवस मंगळ देणार शुभ परिणाम

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हे गोचर राजयोगापेक्षा कमी ठरणार नाही. या राशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. या राशीचे जे लोक बऱ्याच काळापासून घर किंवा गाडी घेण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.

कर्क रास

या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहे. तसंच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केले जातील. तुम्हाला समाजात आदर मिळू शकणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाची संधी मिळणार आहे.

Guru Gochar
Tuesday Horoscope: पगार वाढ होणार, ५ राशींच्या अडचणी दूर होणार; वाचा मंगळवारचे खास राशीभविष्य

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळू शकणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.

Guru Gochar
Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com