Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : तुमचा आजचा दिवस कसा जाईल? आज तुमची राशी काय सांगते , जाणून घ्या.
Horoscope
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

शनिवार,५ ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष.

तिथी-तृतीया अहोरात्र

रास-तुला

नक्षत्र-स्वाती

योग- विष्कंभ

करण-तैतिल

दिनविशेष-वृद्धि तिथी

मेष - काही वेळेला व्यवहार जपताना नाहक कटकटीच्या गोष्टींना आपण बळी पडता. असेच काही कोर्टकचेरीची कामे मागे लागली असल्यास आज ती पार पडतील. निकाल आपल्या बाजूने लागेल.

वृषभ - खाण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी, तब्येतीच्या बाबतीत आज दिवस थोडा तोळामासा दिसतो आहे. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल. स्वतःला जपा.

मिथुन - पैशाची निगडित मोठी गुंतवणूक करताना विचार करा. धनलाभ पण खूप मोठ्या रिस्क नको. संतती सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

कर्क - आपल्या प्रेमाने कुटुंबीयांची मने जिंकाल. काही वेळेला नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण त्या स्वीकाराव्या लागतील. कटकटींचा सामना करावा लागेल.

सिंह - राशीचे गुण लपत नसतात. आज धाडसाने अनेक गोष्टी कराल. जे इतरांना करण्यासाठी खूप वेळ लागतो अशा गोष्टी आज तुम्ही चुटकीसरशी सोडवून टाकाल. इतरांना तुमचा आधार वाटेल.

कन्या- पैशाची आवक जावक चांगली राहिल्यामुळे मनस्थिती चांगली होईल. हिशोब नीट ठेवायलाच हवा. आपल्या राशीचा तो गुणच आहे. नवीन काही गोष्टींची खरेदी होईल.

Horoscope
Chanakya Niti: घरात पैसा सतत खेळता राहील; फक्त 'या' पद्धतीने करा दिवसाची सुरुवात

तूळ - आपले व्यक्तिमत्व बहरून जाईल. आनंदी वार्ता कानावर येतील. प्रतिभा संपन्न व्यक्तींबरोबर आजचा दिवस जाईल. तुमची चेतना आणि ऊर्जा वाढती राहील.

वृश्चिक - नको असलेल्या गोष्टी स्पष्ट नाही म्हणून सांगायला शिका. अन्यथा विनाकारण मनस्ताप करून घ्याल . रागावर नियंत्रण ठेवा.

धनु - सून जावयांचे प्रेम लाभेल. त्यांच्यासाठी तुम्ही केलेल्या गोष्टींचा आज परतावा नक्की मिळेल. नात्यांमध्ये व्यवहार पाहायचा नसतो. पण प्रेमाची नाळ जोडली जाईल.

मकर - कामासाठी प्रवास होईल. राजकारण समाजकारणामध्ये यश मिळणार आहे. सेवाभावी वृत्तीने राहाल, तर वरिष्ठांना आपलेसे कराल.

Horoscope
Chanakya Niti: व्यक्तीला पूर्णपणे उद्धवस्त करतात आयुष्यातील 'या' घटना

कुंभ - नित्य निरंतर ध्यान, जप याने आपली उन्नती होणार आहे. आजचा दिवस खास आजच्या गोष्टींसाठी समर्पित करा. मोठे प्रवासाचा दिवस आहे.

मीन - साधेपणाला आवर घाला. आपला इतर लोक फायदा घेण्याचा आज दिवस आहे. कोणत्याही कागदपत्राशी निगडित सही करणे अथवा त्यामध्ये अडकू नका. सावधगिरीचा सल्ला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com