वार - सोमवार. ज्येष्ठ - कृष्णपक्ष. तिथी - दशमी १०:२७ प. रास- मेष. नक्षत्र - भरणी. योग - सुकर्मा. करण - विष्टि. दिनविशेष - चांगला दिवस
एखादी मनोबल वाढवणारी घटना घडेल .नवा मार्ग सापडेल. अचानक अनेक गोष्टी समोर येतील मनातल्या गोष्टी पूर्ण करताना "पन्ना की तमन्ना" असा दिवस राहिल.
आपल्या वस्तू जपा गहाळ होणार नाहीत ना याची दक्षता घ्या. मोक्षाचा मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माकडे कल राहील. "न जाने क्यूं होता हैं यें जिंदगी के साथ" असे मनस्वास्थ राहील.
नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मन आनंदी राहील. "घाल घाल पिंगा" अशी आज मनाची अवस्था असणार आहे.
कामाच्या ठिकाणी मान वाढेल. अनेक गोष्टी मनासारख्या घडताना दिसतील. कीर्ती वृद्धिंगत होईल. फिरतीचा दिवस आहे.
गुरुकृपा लाभेल. भाग्यकारक घटना घडतील. देवाची दया आणि कर्म या दोन्हीची सांगड चपखल बसेल. उपासना वाढवा.
शासकीय कामांमध्ये अडचणी येतील. वरिष्ठांबरोबर मतभेद नकोत. काही गोष्टी अंगलट येण्याची शक्यता आहे.
आपल्या मतं आणि त्याविषयी आग्रही रहाल. कामाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये मनासारख्या गोष्टी घडतील. भागीदाराचे उत्तम सहकार्य आज मिळणार आहे .जोडीदाराबद्दल "अधीर मन झाले" अशी भावना राहील.
नको ती दुखणी आणि त्रास कटकटी वाढतील. गुप्त शत्रू वाढते राहतील. कामाच्या ठिकाणी दगदग जाणवेल. काही गोष्टी अव्यक्त राहण्यानेच आपल्याला आजचा दिवस थोडा त्रासाचा जाईल.
मनोरंजन कलाक्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील. पैशाची आवक चांगली राहील. एकूण संततीकडून सुद्धा समाधान मिळेल. दिवस सुखाचा जाईल.
घरच्या जबाबदाऱ्या डोके वर काढतील. पण आरोग्य उत्तम राहील कुटुंबीयांच्या मदतीने मानसिक स्वास्थ्य जपाल .
नवी दिशा नवे मार्ग सापडतील. अचानक चांगल्या गोष्टींचा रस्ता सापडणार आहे. प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल. दिवस चांगला.
पैशाची गुंतवणूक योग्य ठरणार आहे. काही गोष्टी खरेदीसाठी आज पैसे खर्च होतील. पण मनाला समाधान मिळेल. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वाटेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.