Horoscope Today : जोडीदाराबरोबर प्रेमाच्या गोष्टी होतील, आजचा दिवस चांगला जाईल; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Horoscope Today 13 September 2024 : तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाईल. तसेच कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? सर्व राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today Marathi
Horoscope Today Marathi Saam tv
Published On

आजचे पंचाग

शुक्रवार,१३ सप्टेंबर २०२४,भाद्रपद शुक्लपक्ष.

तिथी- दशमी २२|३१

रास-धनु २७|२४ नं. मकर

नक्षत्र- पूर्वाषाढा

योग-सौभाग्य

करण-तैतिल

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - मनासारख्या घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. आपण जे कर्म करतो त्या पद्धतीने त्याची चांगली वाईट फलित मिळत असतात. केलेल्या सत्कृत्याचा आज फायदा होईल.

वृषभ - खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरे करणारी अनेक माणसं असतात. अशा लोकांपासून आज सावध राहण्याचा दिवस आहे. मानसिक ताणतणाव आणि शारीरिक श्रम दोन्ही वाढेल.

मिथुन- नव्या काही गोष्टी खरेदीचे योग आहेत. जोडीदाराबरोबर प्रेमाच्या गोष्टी होतील. संसाराची नव्याने स्वप्ने रंगवाल.अबोला असेल तर आज मनमिलाफ होईल.

कर्क- हाताखालच्या लोकांची विनाकारण अरेरावी सहन करावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडी बाचाबाची होईल. आपल्या बोलण्यामुळे गैरअर्थ घेतले जातील आणि मनस्ताप वाढेल.

सिंह - शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उपासना मार्गातून धन मिळण्याचे योग आहेत. उदारपणे धार्मिक ठिकाणी दानधर्म कराल.

Horoscope Today Marathi
Horoscope Today : आर्थिक भरभराट होणार, रागावार नियंत्रण ठेवा; वाचा थोडक्यात राशीभविष्य

कन्या - जागा खरेदी, गाडी खरेदीसाठी आज दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आईचे विशेष काळजी घ्यावी. सुख दाराशी येईल.

तूळ - बहिणीचे सहकार्य लाभेल. कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. छोटे प्रवास होतील त्या प्रवासातून पुढे योग्य मोबदल्याची कामे वाढणार आहेत. दिवस संमिश्र राहील.

वृश्चिक - गायक, कलाकार लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. इतरांकडून वाहवा होईल. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा आजचा दिवस आहे. पैशाची आवक वाढती राहील.

धनु - स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा आजचा दिवस आहे. व्यायामाची आवड वाढेल. व्यक्तिमत्व आकर्षक आणि उठून दिसेल. खरेदीचे योग आहेत.

Horoscope Today Marathi
September Born People: सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात असतं कभी खूशी कभी गम…

मकर- न केलेल्या गोष्टींचे बालंट येईल. कोणी काय म्हटलं याचा विचार उगाचच मनामध्ये सलत राहील पण मनस्ताप होण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा.

कुंभ- ज्येष्ठांसाठी सून -जावयांबरोबर दिवस सुखाचा राहील. नातेवाईक, मित्र यांचे बरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत. जुनी मैत्री दृढ होईल.

मीन - करिअरवर आज विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाचा व्याप वाढता राहील. समाजकारण आणि राजकारणात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com