ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सप्टेंबर महिन्यात ज्या लोकांचा जन्म होतो त्यांच्या आयुष्यावर राशींचा प्रभाव पडत असतो.
हे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. ते स्वत:वर प्रचंड प्रेम करत असतात.तसेच त्यांच कामावर प्रेम असतं.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक दुसऱ्यांवर टीका करणारे असतात. त्यांना शांत राहणं आवडतं पण मुळात ते तसे नसतात.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक कामाच्या बाबतीत खूप एकनिष्ट असतात. त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं त्यांना खूप आवडतं. पण याचा फायदा दुसरे व्यक्ती घेत असतात.
या लोकांच्या मनातलं त्यांच्या जवळचे सुद्धा ओळखू शकत नाहीत. ते प्रत्येकवेळी वेगळा विचार करतात. तसचं समोरच्या व्यक्तींकडून ते खूप अपेक्षा ठेवतात.
पैसा कमवण्यापेक्षा काम कोणतं करतोय या गोष्टींकडे हे व्यक्ती जास्त लक्ष देतात. स्वभावाने ते दानशूर असतात.
या व्यक्तींना लेखन, गायन,विज्ञान,वादन या विषयांमध्ये करिअर घडवायला आवडतं.
हेही पाहा
येथे क्लिक करा...