Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today 12 August 2026: आज बुधवार १२ ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी असून सूर्यग्रहण, व्यतीपात योग आणि कर्क राशीतल्या चंद्राची सूर्य-बुध-गुरूसोबत युती असा विशेष संयोग आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार या ग्रहस्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळा होऊ शकतो.
Ashadh Amavasya 2026
Ashadh Amavasya 2026meta ai
Published On

आज मेष, मिथून, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशींनी करिअर, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये विशेष सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. दुसरीकडे वृषभ, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशींनी डोकं शांत, संयम आणि धार्मिक साधना करून सकारात्मकता मिळवली पाहिजे.

आजचा पंचांग आणि महत्त्वाचे योग

आज अमावस्या तिथी रात्री ११ वाजून आठ मिनिटांपर्यंत राहणार आहे. सकाळी ८.०० वाजता पुष्य नक्षत्र, त्यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरू झालेले आहे. तसेच दुपारी ३.२६ वाजेपर्यंत व्यतीपात योग राहील. आज अभिजीत मुहूर्त उपलब्ध नाही असे पंचांगात नमूद आहे.

आज दुपारी १२.२६ ते २.०५ वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे. त्यामुळे या कालावधीत नवीन करार, मोठे आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Ashadh Amavasya 2026
Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

कोणत्या राशींना फायदा?

वृषभ, कन्या, तुळ, वृश्चिक, कुंभ, मकर आणि मीन राशींसाठी दिवस हा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी, आर्थिक बाबतीत स्थिरता आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळावी.

Ashadh Amavasya 2026
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

कोणत्या राशींनी सावध राहावे?

मेष, मिथुन, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशींनी आज विशेष संयम ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च, वाद-विवाद, मानसिक ताण आणि जोखमीचे आर्थिक निर्णय टाळणे तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असेल.

आजचा उपाय

आज शंकराची आराधना करून 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करण्याची धार्मिक मान्यता आहे. शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. तसेच गरजू व्यक्तीला अन्नधान्य, तिळ किंवा वस्त्रांचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी श्रद्धा आहे.

टीप: हे राशीभविष्य ज्योतिषीय मान्यता आणि उपलब्ध पंचांग माहितीवर आधारित आहे. याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com