
मंगळवार,१९ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,
अजा एकादशी.
तिथी-एकादशी १५|३३
रास-मिथुन
नक्षत्र-आर्द्रा
योग-वज्र
करण-बालव
दिनविशेष-चांगला दिवस
जुन्या गुंतवणुकीमधून लाभ नक्की होणार आहेत. धनसंचयामध्ये भर पडेल. मैत्रीची नाते दृढ होतील. पण आपल्या स्वभावानुसार इतरांशी वागताना थोडे काळजी घ्या.आपल्यामुळे मित्रत्वात कोणी दुखावले जाणार नाही हे बघा.
महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरी. उगाचच एखाद्या कामामध्ये अडथळे येणे काम विलंबाने होणे अशा घटना आज घडतील. बंधन योग आहेत. वायफळ पैसाही खर्च होईल.
आज अजा एकादशी आहे. विशेष विष्णू उपासना आपल्याला सार्थकी लागणार आहे. आरोग्य उत्तम राहील.ठरवलेल्या गोष्टी नियोजित होतील. अनेक कामे एकाच वेळी करण्याचा उत्साह आज असेल.
घरी पाहुण्यांचे आगमन होईल. उत्साहवर्धक वातावरण कुटुंबीयांमध्ये असेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने वरिष्ठांच्या कडून योग्य सल्ला आज मिळेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टी चे निर्णय आज लागतील.
जवळच्या प्रवासा मधून प्रगती दिसते आहे. एखादी जिद्द आणि चिकाटीबरोबर घेऊन कामे कराल. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी उत्तरोत्तर वाढतील. मग तो पराक्रम असो, विद्वत्ता असो, वक्तृत्व असो दिवस चांगला आहे.
सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. वाहन सौख्य मात्र सौख्य चांगले मिळेल. घराशी निगडित सजावटीची कामे आज कराल.
आपल्या आतील कलाकाराला हुरूप येईल. थिएटर्स निगडित असणाऱ्या लोकांना विशेष प्रगती होताना दिसून येईल. संततीकडून सुवार्ता समजतील. प्रेमामध्ये अखंड बुडून मनासारख्या गोष्टी घडवून आणाल. विष्णू उपासना करावी.
अनेक डगरीवर एकट्याने काम करावे लागेल. सहज सोप्या गोष्टीत अडथळे निर्माण होतील. हित शत्रूंचा त्रास संभवतो आहे. तब्येतही थोडी नरम गरम राहील. काळजी घ्या.
कोर्टाच्या कामात यश मिळेल. व्यवसायासाठी नव्याने बैठका होतील. नवे नवे मार्ग सापडतील. उत्तरोत्तर प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. काळजी नसावी.
"ये रे माझ्या मागल्या"असा काहीसा दिवस आहे. "सर्व करून पुन्हा भोपळे चौकात" अशी काहीशी अवस्था होईल. कामाला म्हणावे तशी गती मिळणार नाही. पण आपल्या राशीने चिकाटी न सोडता सातत्याने प्रयत्न करणे योग्य राहील.
आज अजा एकादशी. विशेष विष्णू उपासना करावी. याचे द्विगुणित फळ आपल्या राशीला मिळणार आहे. नवनवीन गोष्टी नवनवीन उलाढाली आज आयुष्यामध्ये घडणार आहे. ज्या आपल्यासाठी कळस अध्याय ठरतील. भाग्य उजळून निघणार आहे.
"एकमेका साहाय्य करू" असा काहीसा दिवस आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबर समजूतदारपणाने आज आपल्याला वागणे गरजेचे आहे. कामाच्या क्षेत्रात यांच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. बढती आणि प्रगतीचे योग आहेत. राजकारण, समाजकारणात यश मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.