Horoscope Today 31 October 2024 : दिवाळीचा आनंद लुटाल, दिवस मजेचा राहील; कुणाच्या राशीत आज काय?
आजचे पंचांग
गुरुवार,३१ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष,नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान(पहाटे ०५:२७)
तिथी-चतुर्दशी १५|५३
रास- कन्या ११|१६ नं.तुला
नक्षत्र- चित्रा
योग- विष्कंभ
करण- शकुनी
दिनविशेष-आनंदी दिवस
मेष - मामाकडे, आजोळी संबंध सुधारतील. आपले भाव वधारतील. दिवाळीचा आनंद लुटाल. पण आपल्या मौल्यवान जिन्नसांची काळजी घ्यावी.
वृषभ - संततीसाठी विशेष काही गोष्टी कराल. त्यांच्यापासून सुद्धा उदंड प्रेम मिळेल. आपल्या भावी जोडीदाराबरोबर आनंदाने दिवस घालवाल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. आनंदी दिवस आहे.
मिथुन - घरी पाहुण्यांची उठबस राहील. नवीन वस्तूची खरेदी होईल. कुटुंबीयांबरोबर नवे काही निर्णय घ्याल आणि दिवस मजेचा राहील.
कर्क- प्रवासासाठी दिवस चांगला आहे. छोटे प्रवास होतील. आपल्यातील कर्तबदारी विशेषत्वाने बाहेर येईल. भावंडांची मदत मिळेल. दिवस संमिश्र राहील.
सिंह- कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. पण त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे आपला त्यांच्यावर दबदबा राहील. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीचा पगडा तुमच्यावर असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही आचरण कराल.
कन्या - संदिग्ध अवस्था टाळा. आपले निर्णय आज अचूक ठरणार आहेत. स्वतः मधील स्वत्व ओळखा. आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुमच्यासाठी दिवस आनंदाने भारलेला आहे.
तूळ - मोठ्या पैशाची गुंतवणूक आज टाळा. शक्य तितके पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. आवढव्य खर्च आटोक्यात येत राहतील यासाठी निर्णय घ्या.
वृश्चिक- हरवलेल्या गोष्टी पुन्हा गवसतील मग ते प्रेम असो, नाते असो, पैसे असो वांवस्तू असो. एकूण दिवसाची सुरुवात आनंदमय होईल आणि शेवट समाधानात होईल.
धनु - कामाशी निगडित नवीन बैठका होतील. त्यातून नव्याने पुढचे प्रस्ताव येतील. सुखाच्या गोष्टींचा संवाद आज सहकार्यांबरोबर आहे. त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल.
मकर- देवाने तुम्हाला आयुष्यात उशिरा गोष्टी दिल्या आहेत. पण त्या चोख दिल्या आहेत. आजच्या दिवसात अशाच आपल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटेल. देवावरचा विश्वास दृढ होईल.
कुंभ - अचानक धनाची शक्यता आहे. जोडीदाराकडून, जोडीदाराच्या कुटुंबीयांच्या कडून सुद्धा पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. गुप्तधन वा तत्सम गोष्टीतूनही धनलाभाचे योग संभवत आहेत.
मीन -प्रेमातून लाभ मिळेल. लाभातून प्रेम वाढेल. एकूणच आजच्या दिवशी सुखाच्या गोष्टी वृद्धिंगत होताना दिसत आहे. भागीदाराकडून योग्य सल्ले मिळाल्यामुळे हुरुपाने आणि उमेदीने कामाला लागाल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.