
HMPV Virus Predictions : HMPV व्हायरसमुळे जगभरात खळबळ माजली आहे. मागील काही तासांमध्ये भारतामध्ये HMPV चे रुग्ण आढळले आहेत. याआधी करोना व्हायरसमुळे सर्वांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला होता. करोना महामारीमुळे जगभरात हाहाकार माजला होता. आता पुन्हा चीनमधून आलेल्या नव्या व्हायरसमुळे सगळेच चिंतातूर झाले आहेत. दरम्यान काशीच्या ज्योतिषाने HMPV व्हायरसच्या प्रभावासंबंधित काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२५ मध्ये कालयुक्त संवत्सर सुरु राहील. १५ एप्रिल २०२५ पासून सिद्धार्थ संवत्सर सुरु राहील. हा कालावधी अत्यंत फलदायी असल्याचे संजय उपाध्याय यांनी सांगितले. दरम्यान कालयुक्त संवत्सर सुरु असताना देशातील प्रजेला शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो, असे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे.
या स्थितीमध्ये स्वतंत्र भारताची कुंडली वृषभ राशीची असून विद्वानांनी भारताची कुंडली मकर राशीची मानली आहे. वृषभ राशीच्या कुंडलीनुसार स्वतंत्र भारताच्या चंद्र महादशामध्ये शुक्राची अंतरदशा सुरु आहे. चंद्र आणि शुक्र दोघेही तृतीय स्थानावर विराजमान आहेत. भारतीय ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक देखील मानला जातो, असे पंडित संजय उपाध्याय यांनी म्हटले आहे.
प्राचीन आचार्यांच्या मते, मकर राशी प्रतिगामी असून सातव्या घरात बसलेली आहे असे भारताची मकर राशीची कुंडली स्पष्टपणे दर्शवते. यानुसार दक्षिण-पश्चिम भागात लोकांच्या आजारपणात वाढ होण्याची शक्यता आहे. राशीचक्र आणि ग्रहांच्या स्थितीनुसार १५ एप्रिल २०२१५ पासून सुरु होणाऱ्या नव्या सिद्धार्थ संवत्सरपासून लोकांना रोगांपासून मुक्ती मिळेल.
पंचांगानुसार, मार्च २०२५ ते मे २०२५ हा काळ कठीण आहे. या कालावधीत शनी आणि गुरुच्या राशीतही बदल होईल. ग्रहांची हालचाल पाहता नवे वर्ष अशांत ठरु शकते असे संकेत दिले जात आहेत. २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल. तर २९ मार्च २०२५ रोजी शनी आपली राशी बदलेल. १४ मे २०२५ रोजी गुरु वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.