

पंचांग
शुक्रवार,२८ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष,दुर्गाष्टमी.
तिथी-अष्टमी २४|१६
रास-कुंभ
नक्षत्र-शततारका
योग-व्याघात
करण-विष्टीकरण
दिनविशेष-१२ नं. चांगला
मेष - थोडक्यात महत्त्वाचे आपल्या राशीला विचार केला तर तुम्ही आपले मित्र नातेवाईक यांना जपून ठेवणे गरजेचे आहे." जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ" आपल्या जवळच्या लोकांकडून तेव्हाच आपल्याला आनंदी क्षण मिळतील. विविध लाभ होणार आहेत.
वृषभ - कामाबरोबर आनंद घेऊन जाणार असे आपले आजची भाकित आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळी पत आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. दिनचर्या सुनियोजित राहील.
मिथुन- हसत खेळत दिवस आनंदाने घालवायला आपल्या राशीला नेहमीच आवडते.काही गोष्टीची ह्या तुमच्या आयुष्यामध्ये सुसंधी मिळणार आहे. अनेक चांगल्या वार्ता कानी येतील. सद्गुरूंची उपासना करावी. विष्णू कृपा राहील.
कर्क - भावनिक ओलावा जपणारी आपली रास आहे. आज मात्र विनाकारण काही त्रास वाढणार आहेत. अनेकदा एकटे पडल्याची भावना सुद्धा होईल. पण दिवसाच्या शेवटी यश मिळेल. अचानक धनलाभ होतील.
सिंह - ऐटीत राहणे आणि शिस्तीत वागणे या आपल्या राशीला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आज मात्र जोडीदाराच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून संसारात आणि व्यवसायात तडजोड करावी लागेल. कोर्टाच्या कामात मात्र यश दिसते आहे.
कन्या - विनाकारण विचार करणे आणि मनोबलाचे खच्चीकरण करणे आज योग्य नाही. कुठून तरी जीवनाविषयी उभारी घेणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार करून पुढे जा. कनिष्ठ व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.
तुळ - जीवनामध्ये किती अडचणी आल्या तरी त्यावर मात करून तुम्ही पुढे जाता. आयुष्य सहजगत्या जगायला आपल्याला आवडते.आज दिवसही अशा चांगल्या अनेक संधी घेऊन आलेला आहे.सृजनशीलता वाढेल. लक्ष्मी उपासना आपल्याला योग्य ठरेल.
वृश्चिक - थोड्या थोडक्या गोष्टीने खचून जाणारी आपली रास नाही. तर अनेक गोष्टींवर मात करता आज मात्र सहज सर्व सुखे तुम्हाला मिळतील. वाहन सौख्य, मातृ सौख्य, गृहसौख्य याच्यासाठी दिवस चांगला आहे.
धनु - काम करताना कोणत्याही गोष्टी आज द्विधा अवस्था ठेवू नका. त्याचबरोबर एखादी गोष्ट करताना खंबीर रहा. आपल्या पराक्रमावर आपले जवळचे लोक खुश होतील. शेजारील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. दिवस संमिश्र आहे.
मकर - जितके कष्टाने मेहनत तुम्ही घेताय त्यापेक्षा चार बोटे कमीच आपल्याला राशीला नेहमी मिळत असते. आज मात्र भगवंताने उदंड काहीतरी दान पात्रात टाकले आहे असे वाटेल. वारसा हक्काची संपत्ती पासून आणि गुंतवणुकीपासून फायदा दिसतो आहे.
कुंभ - नेहमीच इतरांच्या पेक्षा वेगळे काहीतरी करायला आपल्या आवडते. बौद्धिक गोष्टीत आपली रास सरसच आहे. आज नवीन काही शोध कार्य तुमच्याकडून होईल. दिवसाचा आनंद एकटेच लुटण्यात मजा मानाल. आरोग्य चांगले राहील.
मीन - इतरांचे करता करता कधी कधी आपल्याला एकटे पण येते. आपल्या साधेपणाचा फायदा बऱ्याच वेळा घेतला जातो. आज काही गोष्टी तुम्हाला निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा लागेल.अन्यथा मनस्ताप भोगावा लागेल. विनाकारण खर्चही वाढतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.