
शुक्रवार,३ ऑक्टोबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,पाशांकुशा एकादशी.
तिथी-एकादशी १८|३४
नक्षत्र-श्रवण
रास-मकर २१|२८ नं. कुंभ
योग-धृति
करण-वणिज
दिनविशेष-१८ नं. चांगला
मेष - आज आपला राशीला कामाशी निगडित प्रवास होण्याचा दाट संभव आहे. समाजामध्ये मानसन्मान वाढतील. एखाद्या राजकारणी व्यक्तीबरोबर मान सन्मान आणि प्रतिष्ठा लाभण्याचा दिवस आहे.
वृषभ - देवी उपासना फलद्रूप ठरणार आहे. आजवर केलेल्या कामाचे चांगले फलित आजच्या दिवशी मिळेल. संतती सुवार्ता, पुत्र - पौत्रसुख या दृष्टीने दिवस चांगला आहे
मिथुन - पैशाच्या मागे लागून पैसे मिळणार नाहीत. तर कष्ट आणि मेहनत आज सचोटीने कराल तर धनलाभाची शक्यता आहे. भ्रष्टाचार आणि लाच लुचपत यापासून स्वतःला चार हात लांबच ठेवलेले बरे.
कर्क - दिवस आनंदघन घेऊन आलेला आहे. जोडीदाराबरोबर चांगले बॉण्डिंग होईल. व्यवसायातील भागीदार आपल्या मनाप्रमाणे नवनवीन बैठक आणि प्रोजेक्ट घेऊन सल्लामसलतीसाठी येईल. दिवस चांगला आहे.
सिंह - तब्येत जपणं आज गरजेचे आहे. पाठीचे दुखणे, हृदयाचे विकार डोके वर काढतील. मानापमानाच्या गोष्टी जवळ जास्त वेळ बाळगू नका त्याचा ताण येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये मात्र बढतीचे योग आहेत.
कन्या - विद्वान असणारी आपली रास. नवनवीन गोष्टी शिकायला सुद्धा आवडतात. विद्यार्थ्यांना आजचा दिवस नवीन काही शिकण्यासाठी सुसंधी घेऊन आलेला आहे. आपली प्रज्ञा वाढती राहील. विष्णू उपासना करावी.
तूळ - रसिक असणारी आपली रास आहे. आज कुटुंबीयांमध्ये पाहुण्यांचे आगमन होईल. शेती बागायती या कामांमध्ये विशेष सहभाग घ्याल.कुटुंबीयांबरोबर आनंदाने दिवस व्यतीत कराल.
वृश्चिक - आज काही गोष्टी ठरवून होतील असे नाही. पराक्रम वृद्धिंगत होईल. दहा लोकांची काम एकटे करण्याची ताकद आज तुमच्यामध्ये येईल. जिद्द आणि चिकाटी वाढती राहील.
धनु - पैशाची आवक जबरदस्त चांगली राहील. कष्टाने आणि मेहनतीने मिळवलेला पैसा आपल्याला खऱ्या अर्थाने सुख देतो हे आज जाणवेल. गोडधोड खाण्याची मेजवानी आज मिळेल.
मकर - शांततेने आपली कामे करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. इतर कोणाच्या मध्ये लुडबुड करण्यापेक्षा एकटे राहणे आज पसंत कराल. मनाची प्रवृत्ती सात्विक आणि आनंदी राहील. एकटेपणात आनंद शोधाल. आरोग्य चांगले आहे.
कुंभ - काही गोष्टी शक्तीने नाही तर युक्तीने कराव्या लागतील असा दिवस आहे. आपले महत्त्वाचे ऐवज सांभाळा. नको त्या गोष्टीचा ससेमीरा मागे लागणार आहे. काळजी घ्या.
मीन - परदेशाशी निगडित वार्तालाप होतील. व्यवसायामध्ये वृद्धी आणि प्रगती दोन्ही दिसते आहे. प्रदर्शने समाजाशी निगडित वार्तालाप, बैठका यामध्ये दिवस धावपळीचा जाईल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.