Weekly Horoscope: 'या' राशींच्या आर्थिक समस्या सुटणार आहेत; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly horoscope July 20: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि त्यांचे गोचर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करतात. येणारा आठवडा काही राशींसाठी विशेषतः आर्थिक आघाडीवर अत्यंत शुभ ठरणार आहे.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

चतुर्थात होणारी अमावस्या घर, जागा, प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी अनुकूल राहील. कौटुंबिक समस्या सोडवाल, आर्थिक नियोजन होईल. भावंडे-नातेवाइकांचा सहवास लाभेल.

वृषभ

मोठी कामे धाडसाने पार पाडाल. छोटे प्रवास, सहली कराल. सप्ताहात मन उत्साही राहील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मोठी गुंतवणूक होईल.

मिथुन

अमावस्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे. आर्थिक समस्या सुटणार आहेत. दूरचे प्रवास होतील. मोठे खर्च होतील. परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. तरुणांचे विवाह जमतील.

कर्क

सप्ताहात मोठी इच्छापूर्ती होईल. मोठे लाभ होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार यांची प्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. मोठ्या प्रवासासाठी संधी मिळेल.

सिंह

नोकरीनिमित्त मोठे प्रवास, व्हिसा, पासपोर्टची कामे होतील. घर, वाहन खरेदीसाठी उत्तम काळ असून, मोठे कर्ज मंजूर होईल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील.

कन्या

मनासारखी कामे होतील. घर, जागा, वाहन यांचा लाभ होईल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. व्यवसायात मोठी वाढ होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा लाभेल. तीर्थयात्रा, दानधर्म कराल.

Weekly Horoscope
Somwar Upay: नोकरीतील समस्या चुटकीसरशी होतील दूर; फक्त श्रावणापूर्वी भगवान शंकराचे करा हे उपाय

तूळ

नवीन नोकरीची संधी मिळेल. नोकरीत प्रमोशन होईल. व्यवसायात बदल होतील. बदलीसाठी प्रयल केल्यास यश मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळेल. कमी श्रमातून मोठा लाभ होईल.

वृश्चिक

विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. धार्मिक, मंगल कार्य घडतील. तीर्थयात्रा होईल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. अचानक मोठे आर्थिक लाभ होतील.

धनू

प्रवास जपून करावेत. घर, जागेच्या कामात कटकटी संभवतात. हितशत्रूपासून उपद्रव. भागीदारी व्यवसायात चांगला फायदा, वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

मकर

वैवाहिक जीवनात मनस्ताप संभवतो. जोडीदाराची काळजी घ्यावी. भागीदारीत कटकटी संभवतात. मुलांच्या समस्या मार्गी लागतील. शेअर्ससारख्या व्यवसायान लाभहोईल. नवीन नोकरीची संधी मिळेल.

Weekly Horoscope
Ravivar Upay: कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य राहील एकदम ठणठणीत; रविवारच्या दिवशी करा फक्त हे उपाय

कुंभ

शारीरिक-मानसिक स्वास्थ्य खराब राहील. नोकरीच्या ठिकाणी मनस्ताप संभवतो. नोकरी बदलण्याचे विचार येतील. मात्र, सप्ताहात घर, जागा, वाहन खरेदी यांसाठी योग्य काळ राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील.

मीन

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी धावपळ करावी लागेल. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील. भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. आनंदाची बातमी कळेल.

Weekly Horoscope
Surya Gochar: 17 ऑगस्टपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; सूर्याच्या गोचरमुळे धन-संपत्तीमध्ये होणार भरमसाठ वाढ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com