Vish Yog: 2 दिवसांनी तयार होणार धोकादायक 'विष योग'; धनहानीसोबत अपघात होण्याची शक्यता, 'या' राशींनी रहावं जपून

Vish Yoga in Kundli: दोन दिवसांनी एक अशुभ योग तयार होणार आहे, ज्यामुळे काही लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जेव्हा शनि आणि चंद्र युतीत असतात तेव्हा एक धोकादायक विष योग तयार होतो.
Vish Yog
Vish Yogsaam tv
Published On

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे योग तयार होतात. यापैकी काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात. यावेळी या योगांचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. अशाच दोन दिवसांनी एक अशुभ योग तयार होणार आहे, ज्यामुळे काही लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

जेव्हा शनि आणि चंद्र युतीत असतात तेव्हा एक धोकादायक विष योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात विष योग खूप अशुभ मानला जातो. २७ फेब्रुवारी रोजी विष योग तयार होणार असून हा विष योग शनीच्या कुंभ राशीत असणार आहे. शनि आधीच त्याच्या कुंभ राशीत आहे आणि २७ फेब्रुवारी रोजी चंद्राच्या गोचरमुळे तो कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे, कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे विष योग निर्माण होईल.

Vish Yog
Chandra Grahan 2025: 14 मार्चपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ; पैशांच्या नुकसानीसह आरोग्यही बिघडणार

कुंभ राशीत विष योगाची निर्मिती ३ राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या काळात तुमच्या हातून संधी निसटण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि विष योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नवीन काम सुरू करणं टाळलं पाहिजे. कोणाशीही वाद ओढावू नका.

Vish Yog
Trigrahi Yog: मीन राशीत तयार होणार त्रिग्रही राजयोग; 'या' ३ राशींच्या व्यक्ती गडगंज श्रीमंती अनुभवणार

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी विष योगामुळे काही कामात अपयश येऊ शकतं. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी प्रवास करणं टाळावं. व्यवसायाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी तणाव असण्याची शक्यता आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनाही विष योग हानी पोहोचवू शकतो. या काळात अनावश्यक खर्च तुमचं बजेट बिघडू शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Vish Yog
Neechbhang Rajyog: 100 वर्षांनी बुध ग्रह बनवणार डबल नीचभंग राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com