Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, आर्थिक प्रश्न मिटतील; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार ठरणार लकी

Rashi Bhavishya 9 March 2024: आजचे राशिभविष्य, ९ मार्च २०२४ नोकरीचा योग येईल, आर्थिक प्रश्न मिटतील; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार ठरणार लकी, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...
Rashi Bhavishya Today 9th March 2024
Rashi Bhavishya Today 9th March 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी कोणताही सौदा न केल्यास चांगले राहील. महत्वाच्या कामाबद्दल कोणालाही सांगू नका. मित्रांकडून आर्थिक मदत होऊ शकते.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

आजच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींना गोड बातमी मिळेल. तुमची महत्वाची कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. वाहने जपून चालवा.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना आज कठोर परिश्रम करावे लागतील. आजच्या दिवशी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मागे पडू शकता.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनिवार भाग्याचा आहे. आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. घरी नव्या पाहुण्याचे आगमन होईल.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस अनुकूल असेल. आजच्या तुमच्या शरीरात अनेक कामांबद्दल उत्साह राहील. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी थोडा संकटाचा दिवस आहे. कारण, अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस संकटाचा आहे. तुम्ही पालकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करा, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील. बाहेगावी जाताना वाहने सावकाश चालवा.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनिवार नशीबात बदल घडवणारा असेल. आत्मविश्वासाने दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीचा योग चालून येईल.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी आज थोडे सतर्क राहावे. कारण, आज घाईघाईने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. कुणालाही पैसे उधार देऊ नका, ज्यामुळे तुमचे व्यवहार खराब होऊ शकतात.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनिवारी गोड बातमी मिळेल. तुमचे सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. पण आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन राशीच्या व्यक्तींन आज भविष्य उज्वल बनवण्यासाठी सुवर्णसंधी मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना व्यवसायात फायदाच फायदा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com