Horoscope Today 15 May 2024
Horoscope Today 15 May 2024Saam TV

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope Today 15 May 2024 : आजचे राशिभविष्य, १५ मे २०२४ :या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

आजचे पंचाग १५ मे २०२४

वार - बुधवार तिथी - शु.अष्टमी. नक्षत्र- आश्लेषा. योग - वृद्धी. करण - विष्टि.रास - कर्क १५.२५ नंतर सिंह. दुर्गाष्टमी. दिनविशेष - वृद्धीतिथी.

मेष : आजचा दिवस स्वप्नाळू

रात्रीच्या अंधारात उद्याची स्वप्न असतात. आजचा दिवस असा स्वप्नाळू आहे. काही गोष्टी ठरवून करायच्या असतात आणि त्या तुम्ही आज नक्की कराल.

वृषभ : छान लेखन करा

शुक्र कलेचा कारक म्हणजेच काय तर नुसतं नृत्य, गायन हवे असे नाही तर लेखनकला ही सुद्धा कला आहे. या गोष्टी जर आपल्याला आवडत असतील तर चला मग कागद पेन घेऊन काहीतरी छान लेखन करा. मस्त सुचतील काही गोष्टी.

मिथुन : आज पैसे मिळवण्याचा दिवस

तशी आपली रास पैशाला लोभी नाही पण पैसे हवे असतात. मग त्यासाठी काही लांडी लबाडी करावी लागली तरी चालते. आणि म्हणून आज पैसे मिळवण्याचा दिवसच म्हणावा लागेल.

कर्क : आज आनंद मिळवाल.

प्रत्येकाचा आनंद वेगळा गोष्टीत असतो. आपली भावनिक रास आहे. नातेवाईक जवळचे लोक यांनी घरी आलेले तुम्हाला आवडते. त्यांचे आगत स्वागत आदरातिथ्य छान करता. त्यातच आनंद शोधता. तो आज मिळवाल.

सिंह : सकारात्मकता वाढवावी.

"बंदिवान मी या संसारी" अशाच उगाच गोष्टी मनात येतील. खरंतर सगळे अलबेल चालू असतं. पण आपलं मनच आपल्याला सांगत असते की हे काही बरोबर नाही. हा तिढा सुटण्यासाठी आज जास्त सकारात्मकता वाढवावी लागेल.

कन्या : लोकांशी संपर्कात रहाल

ठराविक लोकांशीच कनेक्ट राहायला आपल्याला आवडते. "रियल इज रेअर" असे म्हणून आज हक्काच्या लोकांशी संपर्कात रहाल.

Horoscope Today 15 May 2024
Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

तूळ : दिवस भाग्याचा आहे

बौद्धिक रास म्हणताना बुद्धीची काम आपोआप होतात. कामाच्या ठिकाणी हिच बुद्धी तुमच्या शिरपेचात नवीन तुरा खोवणार आहे.

वृश्चिक : आजचा दिवस छान

कोणी असेल तर बरोबर नाही तर मी एकटाच बरा. अशी तुमची भावना असते. ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत त्या टळत नाहीत. हे तुम्हाला समजून चुकले आहे. आध्यात्मिक प्रवास सद्गुरूंची भेट या सगळ्या गोष्टी एकट्यालाच तर करायच्या आहेत. त्यासाठी आजचा दिवस छान.

धनू : काही गोष्टींकडे दुलर्क्ष करा

"आज भीती कुणाची कशाला" असा दिवस अजिबात नाही. विनाकारणच दडपण, भीती, दबदबा अशा गोष्टी आजूबाजूला जास्त जाणवतील. स्वास्थ हवे असेल तर याकडे दुर्लक्ष करणेच आज चांगले.

मकर : जीव ओतून काम कराल

कामामध्ये जीव ओतून काम कराल आणि त्याचं यश आज पदरात पडणारच आहे. ठरवलेले घडणार म्हणून नेटाने पुढे चला.

कुंभ : तब्येतीची काळजी घ्या

"चोरावर मोर" असे आज आपल्या हाताखालचे लोक वागतील. नक्कीच ते तुम्हाला आवडणार नाही. म्हणून आधीच सावध राहा. तब्येत जपा. दगदग टाळा.

मीन : उपासनेला महत्त्व द्या

माशासारखा साधेपणा आपल्या राशीत आहे. देवाचे सुद्धा करायला आवडते. तुमची रास जरा देवभोळी आहे. म्हणून आज विशेष उपासनेला महत्त्व द्या. संतती सौख्य चांगले. नवीन गोष्टी आचरणात आणाल.

Horoscope Today 15 May 2024
Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com