आजचे पंचांग १८ मे २०२४
वार - शनिवार. तिथी - शु. दशमी. नक्षत्र - उत्तरा. योग - हर्षण. करण - गरज. रास - कन्या दिनविशेष - चांगला दिवस.
मेष : ताणतणाव वाढेल
"आलीया भोगासी असावे सादर" असा आजचा दिवस आहे. जे ताणतणाव कटकटी असतील त्याला तर सामोरे जावेच लागेल ना. विनाकारण खंत करून काय उपयोग?
वृषभ : मनोबल छान राहील
काही वेळेला गोष्टी न ठरवता अगदी सहज होतात तसाच आजचा आपला दिवस आहे. मनोबल छान राहणार आहे. देवाची विशेष कृपा आहे.
मिथुन : दिवस चांगला जाईल
फिरती, भ्रमंती, अनेक विचार त्यातूनच कामांमध्ये हलकेफुलके वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कराल आपल्या बाजूने सहकाऱ्यांचा कौल राहील.
कर्क : आज व्यस्त राहाल
परदेशी जाण्याचे बेत, त्यासंबंधी असणारे व्यवसाय यांच्यावर करार होणे अशा घटना घडतील. पुढील काही आकडेमोड करणे यामध्ये आज व्यस्त राहाल. एकूण लाभ दिसत आहे.
सिंह : स्वत:ला अडकवून घेऊ नका
उगाचच इतरांवर उपकार करण्याच्या नादात स्वतःला कोणत्या गोष्टीत अडकवून घेऊ नका. आपली रास उदार लोकांची रास आहे. तरीसुद्धा करूनही आपल्याला नावे ठेवली जातात. आज तो क्षण टाळा.
कन्या : दिवस आनंदात घालवाल
"माझिया मना जरा बोल ना" असा आजचा दिवस आहे. मनाशीच गुजगोष्टी. सकारात्मकता, थोडंसं स्वप्नाळूपण घेऊन आजचा दिवस आलेला आहे तर मजा लुटा.
तूळ : आवकजावक चांगली राहील
मुळात आपली रासच अर्थत्वाची आहे त्यामुळे आज पैशाच्या दृष्टीने दिवस चांगला राहणार आहे. आवकजावक चांगली राहील. त्यामुळे मन प्रफुल्लित होईल.
वृश्चिक : गुपित उघडे करू नका
कायम काही गोष्टी गुप्त ठेवण्याची आपली कला आहे. खरंच आज या गोष्टींमुळे पराक्रमात विशेष बळ येईल. कारण शत्रू पुढे सर्व गोष्टी उघड करायचा नसतात हे आपल्याला पक्के माहित आहे.
धनु : सावधगिरी बाळगा
"कधी असे तर कधी तसे वागावे कसे" हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. आज विनाकारण आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबीय भरडले तर नाही ना? हे पहा.
मकर : शांतपणे काम कराल
सृजनशीलता, कला यांच्याशी आपला खूप जवळचा संबंध नाही खरे. पण आज असे काहीतरी करावेसे वाटेल. शांतपणे कामांमध्ये व्यस्त राहाल.
कुंभ : आजचा दिवस अडकलेला
सेवा करणे आणि करून घेणे अशा मध्ये आजचा दिवस अडकलेला आहे. म्हणूनच आपले बॉस आणि आपल्या हाताखालचे सहकारी या दोघांची योग्य ते संधान बांधल्यास दिवस बरा.
मीन : एकमेकांचा विचार करा
"तूं तूं मैं मैं" करत पती-पत्नीचं आज "गंगेत घोडं न्हालं" असा दिवस राहणार आहे. म्हणजे काय ठरवलेल्या गोष्टी कोणाच्यातरी मनाने आज पूर्णत्वाला जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांचा विचार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.