Horoscope Today : आज 'या' 5 राशींच्या लोकांच्या मनाप्रमाणे घटना घडतील; यशाचा टप्पा गाठाल, वाचा राशी भविष्य

Rashi Bhavishya Today 19 June 2024 : राशीचक्रानुसार आजचा दिवस या ५ राशींच्या लोकांसाठी अत्यंत खास असेल. काहींच्या मनाप्रमाणे घटना घडतील. यशाचा टप्पा गाठाल.
Horoscope
Rashi Bhavishya Today 19th June 2024Saam Tv

आजचे पंचांग १९ जून २०२४

वार - बुधवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल द्वादशी. नक्षत्र - विशाखा. योग - सिद्ध. करण - बालव. रास ११.०५ नंतर वृश्चिक. दिनविशेष - १७ नंतर चांगला.

मेष : गुप्तधनाची ओढ वाटेल

शारीरिक श्रम, कष्ट, दगदग याचा लेख आज उंचावणारा राहणार आहे. गुप्तधनाशी निगडित उगाचच ओढ वाटेल. गुढ प्रश्न मनाला सतावतील. सावध राहा.

वृषभ : आयुष्याचे नवीन स्वप्न पाहाल

"स्वप्नात रंगले मी चित्रात दंगले मी" असा आजचा दिवस राहणार आहे. आयुष्याचे नवीन स्वप्न पाहाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडीदार नवीन कामात मदत करेल. कोर्टाचे निर्णय मनाप्रमाणे लागतील.

मिथुन : माहेरची विशेष ओढ वाटेल

आजोळी विशेष ओढ वाटेल. मामांचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. नोकरीच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी आपला मार्ग आज आपण सुकर कराल.

कर्क : कामाच्या ठिकाणी व्यापकता वाढेल

"आज दिन चढेंयां" असा आजचा दिवस आहे. उत्तरोत्तर मजा अधिक होईल. प्रणयी आणि गुलाबी रंग आज दिवसात भरतील. कामाच्या ठिकाणी सुद्धा व्यापकता वाढेल. एकूण दिवस आनंदी राहणार आहे.

सिंह : कुटुंबीयांवर दरारा राहील

आपला धाक आणि दरारा आज कुटुंबीयांवर राहील. पण दहशत नसावी. अन्यथा विनाकारण त्रास वाढेल. जमिनीचे व्यवहार असतील तर आज मार्गी लागतील.

कन्या : आकाशाला गवसणी घालणारा दिवस

ज्या काही आपल्याकडे कला असतील त्यामुळे आज आपला उदो उदो होण्याची शक्यता आहे. एकूणच आकाशाला गवसणी घालणारा आपला दिवस आहे. त्यामध्ये मग्न राहाल.

Horoscope
Horoscope Today : निर्जला एकादशीला जुळून आला खास योग; या राशींच्या लोकांना कामात मिळणार मोठे यश

तूळ : आनंद आणि पैसा दोन्ही मिळेल

आनंद आणि पैसा या दोघांचा समेट म्हणजे आजचा दिवस आहे. याच्यामुळे ते आणि त्याच्यामुळे हे या अशा दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. पण या दोन्ही गोष्टी मिळण्याचा आज दिवस आहे. त्यामुळे मजा लुटा.

वृश्चिक : स्वतःमध्ये मग्न आणि व्यस्त राहाल

"मी कशाला आरशात पाहू गं, मी कशाला बंधनात राहू गं" असा आजचा दिवस आहे. स्वतःमध्ये मग्न आणि व्यस्त राहाल. काही गोष्टी इतरांना दिल्यामुळे आपल्या वृद्धिंगत होतील. सकारात्मक रहाल .

धनु : आज अडचणी येऊ शकतात

"नमनाला घडाभर तेल" असा आजचा दिवस आहे. केलेली गोष्ट ठरवून सुद्धा अजून अडचणी येतील. मानसिक अस्वस्थता आणि खर्च या दोन्हीचे प्रमाण वाढते राहील.

मकर : शनि महाराजांची कृपा राहील

सामाजिक उपक्रम व कार्य याच्यामध्ये आज व्यस्त राहाल. शनि महाराजांची कृपा राहील. जुनी रेंगाळलेली कामे आज मार्गी लागतील. अनेक लाभ होतील.

कुंभ : यशाचा टप्पा गाठाल

"दिवसाला सोनेरी आभा" असा आजचा दिवस राहणार आहे. तळपत्या सूर्यासारखे काही गोष्टी आयुष्यात घडतील. आपल्या बुद्धी चातुर्यावर आपण खुश राहाल. सहकारी मदत करतील आणि यशाचा टप्पा गाठाल.

मीन : अध्यात्मात प्रगती होईल

"हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. असा आजचा दिवस आहे. देवधर्म अध्यात्म यांत सुख वाटेल. अगदी शारीरिकरित्या नाही जमलं तरी सुद्धा मानसिकता तरी अशीच राहील. आपल्यामुळे कोणाचं वाईट होणार अशी इच्छाही होणार नाही. अध्यात्मात प्रगती होईल.

Horoscope
Tula Rashi Bhavishya : तूळ राशीच्या लोकांमध्ये असतात 'या' खास गोष्टी, जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि गुण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com