Rashi Bhavishya: बुधवार या राशींसाठी खास, जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय लिहलंय

Horoscope Today 22 May 2024 : आजचे राशिभविष्य, २२ मे २०२४ : बुधवार या राशींसाठी खास, जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय लिहलंय; वाचा संपूर्ण राशिभविष्य
Rashi Bhavishya
Horoscope Today 22th May 2024Saam TV

आजचे पंचाग २२ मे २०२४

वार - बुधवार तिथी - शु.चतुर्दशी. नक्षत्र - स्वाती. योग - वरियान. करण - गरज ०६.१९ पर्यंत नंतर वाणिज. रास - तूळ २६/५६ नंतर वृश्चिक. दिनविशेष - विशाखा वर्ज्य.

मेष : दिवस चांगला जाईल

जोडिदाराचे मन राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल. खरेदी करणे, मनोरंजन याबरोबर एकमेकांसोबत दिवस चांगला जाईल. खूप नाही जमले तर निदान एकमेकांशी बोलून नक्की गोड रहाल. कामाचा रगाड्यातून वेळ काढावा अशी भावना येईलच.

वृषभ : संकट ओढवून घेऊ नका

आपल्या वस्तू जपा. त्याच बरोबर आपल्या मनस्वास्थ्य सुध्दा जपा. आपण विनाकारण कोणाबरोबर वादविवाद करून संकट ओढवून घेऊ नका. तब्येतीकडे लक्ष द्यावे.

मिथुन : विकासासाठी विशेष प्रयत्न कराल

मुलांच्या सुट्टीचे दिवस सुरू झालेत. त्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न कराल. मुळामध्ये आपल्यातच असलेल्या कलागुणांचा त्यांना काही उपयोग होतोय का याचा विचार करून सहकार्य कराल.

कर्क : कामांमध्ये व्यस्त राहाल

आपली असणारी भावनिक रास. घरी पाहुणे आलेले आवडतं. त्यांचे आगतस्वगत करण्यात आजचा दिवस जाईल. अर्थात कोणतीही अपेक्षा न करता कामांमध्ये व्यस्त राहाल.

सिंह : भावंडांमध्ये वरचढपणा राहील

आपण बहुतांशी इतरांचे खूप करता. दानशूर स्वभाव व आपली दानात चांगली आहे. आज याच गोष्टींमुळे भावंडांमध्ये वरचढपणा राहील. वेगळे काहीतरी केल्याचं आत्मिक समाधान लाभेल.

कन्या : गुंतवणूक चांगली करा

जुन्या आठवणी, कुटुंबीयांच्या सयी यात गुंतून जाल. पैशाला महत्त्व खूप आहे हे जाणीव करून देण्याचा आजचा दिवस आहे. आवक चांगली राहील म्हणून गुंतवणूकही चांगली करा.

Rashi Bhavishya
Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

तूळ : कोणाची गरज लागणार नाही

"हसतें हसतें कट जाए रस्ते जिंदगी युहीं चलती रहें" असा आजचा दिवस आहे. मजेत आनंदात झुलत राहाल. विशेष कोणाची गरज लागणार नाही. स्वमस्त स्वधुंद.

वृश्चिक : उपासनेसाठी दिवस चांगला

"नको रे मना क्रोध अंगीकारू" असा संदेश आपल्यासाठी आज आहे. मनस्ताप करून स्वतःलाच त्रास होईल आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवा. उपासनेसाठी दिवस चांगला.

धनु : लाभाचा फायदा करून घ्या

"आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा" असा आजचा दिवस आहे. नवीन उमेद घेऊन कामाला लागलात तर लाभच लाभ पदरात पडणार आहेत . त्याचा फायदा करून घ्या.

मकर : नवीन योजना आखणी कराल

फिरती, भ्रमंती कामासाठी विशेष भेटीगाठी आणि नवीन योजना आखणी या गोष्टी घडतील. अर्थात यामधून फायदाच होईल. पुढच्या कामाची नव्याने वीट रचली जाईल.

कुंभ : भगवंताची आराधना करा

"असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी" असा आजचा दिवस आहे. सहजगत्या विनासायास घटना घडताना दिसतील आणि म्हणूनच भगवंताची आराधना करा. त्याचे उपकार माना.

मीन : आपला मार्ग पक्का करा

"ससेहोलपट म्हणजे काय?" हे आज समजून येईल. शरीर जपा. मनस्वास्थ्य जपा. विनाकारण कोणी कामात मोडता घालत आहे ही जाणीव होईल. पण ती झटकून आपला मार्ग पक्का करा.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com