Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

Kartik Saptami Horoscope Predictions: मंगळवार, कार्तिक महिन्याच्या सप्तमीला एक विशेष शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे ४ राशींच्या लोकांसाठी नवीन कामांची सुरुवात करणं अत्यंत यशस्वी ठरणार आहे.
Today's lucky zodiac signs
Today's lucky zodiac signssaam tv
Published On

आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज मंगळवारचा दिवस असून ऊर्जा, कार्यसिद्धी आणि धैर्याचा प्रतीक यांचा हा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी नव्या कामांच्या आरंभ करू शकता कारण हा दिवस अनुकूल आहे. घरात धार्मिक वातावरण राहील आणि आरोग्याबाबत सकारात्मकता जाणवणार आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथी: शुक्ल सप्तमी

  • नक्षत्र: पूर्वाषाढा

  • करण: गर

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: धृति (सकाळी 07:51:19 पर्यंत)

  • दिन: मंगळवार

  • ऋतु: शरद

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:23:38 AM

  • सूर्यास्त: 05:38:12 PM

  • चंद्रोदय: 12:12:09 PM

  • चंद्रास्त: 10:42:32 PM

  • चंद्र राशी: धनु

हिंदू मास आणि संवत्सर

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • अमान्त मास: कार्तिक

  • पूर्णिमांत मास: कार्तिक

Today's lucky zodiac signs
Weekly Horoscope: 'या' राशींचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अशुभ मुहूर्त

राहु काल: 02:49:33 PM ते 04:13:52 PM

यंमघंट काल: 09:12:16 AM ते 10:36:35 AM

गुलिकाल: 12:00:55 PM ते 01:25:14 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:38:00 AM ते 12:22:00 PM

या चार राशींना आजच्या दिवशी मिळणार लाभ

मेष रास

आज मेष राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढल्याचे जाणवणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळू शकणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. जुने प्रश्न मिटणार आहेत. यावेळी महत्त्वाच्या व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.

Today's lucky zodiac signs
Weekly Horoscope: या राशीच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात मनासारखं यश मिळेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभाचे योग आहेत. यावेळी तुमचे नवे संपर्क प्रस्थापित होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि करिअरशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ असणार आहे.

Today's lucky zodiac signs
Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींचं शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यश आणि सन्मान मिळवणारा ठरणार आहे. नोकरीत बढतीचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात समाधान मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे.

Today's lucky zodiac signs
Weekly Horoscope: या राशींचा शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com