Horoscope Today : मनासारख्या गोष्टी जगण्यासाठी धडपड कराल, तर काहींना घ्यावी लागेल आईच्या तब्येतीची काळजी, वाचा तुमचे राशीभविष्य

rashi bhavishya in marathi : काहींना मनासारख्या जगण्यासाठी धडपड करावी लागेल. तर काहींना घ्यावी लागेल आईच्या तब्येतीची काजी घ्यावी लागेल. वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?
Rashi Bhavishya
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

बुधवार,८ जानेवारी २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी- नवमी १४|२६

रास- मेष

नक्षत्र- अश्विनी १६|३०

योग- सिद्ध योग

करण- कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - कामाची ताकत आज वेगळ्या पद्धतीने राहील. आज शरीर उत्साह आणि ऊर्जा घेऊन काम करेल. मनासारख्या गोष्टी जगण्यासाठी धडपड कराल .दिवस आनंदी आहे.

वृषभ - स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. मग तो कपडे, दागदागिने असेल किंवा मनोरंजनासाठी सुद्धा असू शकेल. पण मग दिवसाच्या शेवटी खर्च झाला म्हणून वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही. हा खर्च तर होणारच होता.

मिथुन - पत्रव्यवहार मार्गी लागतील. कामाचे स्वरूप व्यापक राहील. जुन्या केलेल्या कामामधून उत्तमरित्या परतावा आज मिळणार आहे.

Rashi Bhavishya
New Year Vastu Tips: नव्या वर्षात घरातील 'या' गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेऊ नका; आयुष्यभर भासेल पैशांची कमतरता

कर्क - समाजकारणात यश मिळेल. प्रवासामध्ये धावपळ दगदग होईल. पण आपल्या कामाला योग्य ती शाबासकी सुद्धा मिळेल. हुरुप वाढेल.

सिंह - नवी उमेद, नवीन आशा या आज घडणाऱ्या गोष्टींमुळे पुन्हा पल्लवीत होतील. रवी उपासना आज केलेली फलदायी राहील. दिवस भाग्याचा आहे.

कन्या - ठरवलेल्या गोष्टी तशाच नियोजनबद्ध होतील असे वाटत नाही. अडथळे आणि अडचणी पार कराव्या लागतील. संदीग्ध अवस्था टाळा.

Rashi Bhavishya
Vastu Tips: घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी करा 'हे' मिठाचे सोपे उपाय

तूळ - प्रेमात पराक्रम कराल. व्यवसायात एक चांगली उंची गाठावी लागेल. प्रेमामुळे जग जिंकाल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - झालेल्या गोष्टींचा आज विचार करू नका. तर आलेल्या गोष्टींना सामोरे जा. वरिष्ठांकडून कामाचे दडपण तर कनिष्ठांकडून अरेरावी सहन करावी लागेल. दिवस जरा त्रासदायक आहे. मनस्थिती स्थिर ठेवा.

धनु - प्रेमात सगळे माफ आहे. आज आपण प्रेमात पडाल.शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धनलाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

Rashi Bhavishya
Vastu Tips : मनी प्लांटला बांधा ही एक गोष्ट , तिजोरी कधीच राहणार नाही रिकामी

मकर - आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल शेतीच्या कामामध्ये फायदा होईल. घरी धार्मिक कार्य घडेल.

कुंभ - जोडीदाराकडून भाग्योदय संभवतो आहे. नियोजित आणि सुरळीतपणे ठरलेली कामे होतील. छोटे प्रवास घडतील.

मीन - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. विनाकारण कटकटी आणि त्रास त्यामुळे संभावत आहेत. पण पैशाची आवक चांगली राहिल्यामुळे यावर बऱ्याच अंशी मात कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com