Saam Tv
मनी प्लांट हे नावाप्रमाणेच आहे. संपत्ती आकर्षित करण्यासाठी लोक ते घराच्या परिसरात लावतात. त्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असं वास्तू शास्त्रात म्हंटलं जातं.
वास्तुशास्त्रात मनी प्लांटला खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे धनधान्यासोबतच घरात सुख-शांती वाढते.
जर तुम्ही घरात मनी प्लांट लावत असाल तर शुक्रवारी हे रोप लावणे शुभ असतं. त्याचबरोबर आग्नेय दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक लाभ होतो.
जर तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार ऑफिसवर डेस्क उत्तर किंवा पूर्व दिशेला हे रोप ठेवणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, लवकर पैसा मिळवण्यासाठी मनी प्लांटला लाल रंगाचा धागा किंवा कलव बांधावा. बांधताना शुद्धतेची विशेष काळजी घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT : इन्स्टाग्रामवर अनफॉलो; फोटोही डिलीट, क्रिकेटर युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा संसार अर्ध्यावरच मोडणार?