Shaniwar Horoscope: आज या राशींवर शनिदेवाची होईल कृपा, अपुरी इच्छा होणार पूर्ण

April Horoscope 2024: वैदिक दिनदर्शिकेनुसार आज शनिवार असून शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रात 12 ग्रहांचे तपशीलवार वर्णन केले आहे.
Shaniwar Horoscope
Shaniwar HoroscopeSaam Tv

April Horoscope 2024: 

वैदिक दिनदर्शिकेनुसार आज शनिवार असून शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रात 12 ग्रहांचे तपशीलवार वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींचेही तपशीलवार वर्णन केले आहे.

शनिवारी न्याय आणि कर्म देणाऱ्या शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. तर आज या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की शनिदेवाची पूजा विधीनुसार केल्याने कोणत्या राशीला कोणते फायदे मिळू शकतात...

Shaniwar Horoscope
Horoscope : 'या' ३ राशींवर आज शनी पडणार भारी; वाचा तुमची रास यात आहे का?

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. पण खर्च वाढू शकतो. कामाशी संबंधित मानसिक तणाव असू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच करिअरमध्ये वाढ होण्याच्या भरपूर संधी आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील शनिदेवाच्या कृपेने समाजात मान-सन्मान वाढेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये अपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची भावना येईल. जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Shaniwar Horoscope
Horoscope : शुक्रवारी 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार; फक्त कुणालाही उलट बोलू नका

सिंह

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांवर शनिदेव प्रसन्न राहणार आहेत, कारण आज तुम्हाला सर्व कार्यात यश मिळेल. कामानिमित्त तुम्ही दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. ऑफिसमध्ये नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. खाण्यापिण्याच्या सवयींकडे अधिक लक्ष द्या, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला जाईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com