Todays Horoscope: आजचा दिवस 'या'चार राशींना कठीण, आरोग्याची काळजी अन् खर्चावर नियंत्रण आवश्यक; वाचा, तुमच्या राशीत काय?

Aajche Rashi Bhavishya: रोज प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो. त्यामुळे आज तुमचा दिवस कसा असणार, हे जाणून घेण्यासाठी राशीभविष्य वाचा.
Horoscope
Horoscope Today 17 June 2024Saam TV

आजचे पंचांग २० जून २०२४

गुरुवार दिनांक २० जून २०२४. तिथी -ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी. योग- साध्य. करण- तैतील. रास+ वृश्चिक. दक्षिणायनारंभ. शिवराज्याभिषेकोत्सव दिन. दिनविशेष - १८ पर्यंत चांगला.

मेष - चिडचिड वाढेल.

खरंतर काही गोष्टींना तितकं महत्त्व नसते. पण आज थोड्या जरी मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत, तरी पापड मोडल्यासारखं होईल. मन: स्वस्थ खराब होईल आणि चिडचिड पण वाढेल. काळजी घ्या.

वृषभ - प्रवासातून विशेष फायदा.

राशीमध्येच असणारी रसिकता आज वाढीस लागणार आहे. अनेक गोष्टी मनासारख्या घडतील रादर करून घ्याल. खर्चावरही जरा नियंत्रण ठेवा. प्रवास घडतील. प्रवासातून विशेष फायदा सुद्धा होईल.

मिथुन - मानसिक ताण, त्रास होतील.

तुम्ही एखादी गोष्ट बोलली तर त्याचा गैर अर्थ निघण्याचा आज दिवस आहे. जवळचे लोक विनाकारण दुखावले जातील. त्यामुळे शत्रुता वाट्याला येईल. मानसिक ताण, त्रास होतील. त्याकडे लक्ष द्या.

कर्क - उपासनेकडे कल ठेवा.

भावनिक आणि कोमल असणारी आपली रास आज वेगळेच विचार मनामध्ये येतील की जे आनंदात वाढ करतील. संततीबाबत काहीतरी खुशखबर कानावर येण्याचा आजचा दिवस आहे. उपासनेकडे कल ठेवा.

सिंह - धडाडीचे निर्णय घ्याल.

धाडस आणि धडाडीचे निर्णय घ्याल. जागेशी निगडित गोष्टी आज मार्गी लागतील. वाहन खरेदी करणार असल्यास त्याचे सुतोवाच आज होईल. आई विषयी जास्त प्रेम वाढेल.

कन्या - यश मिळेल.

भावंडांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्र मोठे होईल पण दिधा अवस्था न ठेवता असलेले काम हातात घ्या. पराक्रमाने तडीस न्या. यश तुमचेच आहे.

तूळ - गुंतवणूक सुद्धा होईल.

पैशाची आवक जावक चांगली राहील. काही गोष्टी ठरवल्या असतील त्या पद्धतीने गुंतवणूक सुद्धा होईल. रुची अर्थातच रसना वाढेल आणि त्याचा आनंद घ्याल .

वृश्चिक - सकारात्मकता वाढेल.

आपले व्यक्तिमत्व आज खुलून येईल. आपल्यामध्येच दंग राहाल. इतरांना सुद्धा तुमच्यासकारात्मकता वाढेल. असण्याने बरे वाटेल. आनंदी दिवस.

Horoscope
Horoscope Today : या राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने पावले टाकावीत, तब्येतीची काळजी घ्या; वाचा आजचे राशीभविष्य!

धनु - खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.

आज पैशावर आणि म्हणजेच खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वायफळ खर्च करू नका. वस्तू गहाळ होणे, मानसिक स्वास्थ्य याकडे विशेष लक्ष द्या. मात्र अफवांवर लक्ष ठेवू नका.

मकर -मनासारख्या गोष्टी घडतील.

कनिष्ठांकडून आदर आणि ज्येष्ठांकडून कदर होईल. मनासारख्या गोष्टी घडतील. सामाजिक कार्यात धडाडीने पुढे जाल. जुने मित्र-मैत्रिणी भेटण्याचे आज योग आहेत.

कुंभ - आज काम खूप असेल

काम, काम आणि काम असा आजचा दिवस आहे. कामाचा डोंगर उपसावा लागेल. पण यामधून त्रास होणार नाही तर यश कीर्ती याच्याकडे आपली आज वाटचाल होईल. काही गोष्टी न बोलताच कराल. त्यामुळे कदाचित थोड्या अवधीमध्ये अधिक कामाचा पल्ला गाठाल.

मीन - विशेष गुरुकृपा.

आजचा दिवस आपल्यावर विशेष गुरुकृपा घेऊन आलेला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी सहज होतील. धर्म ,अध्यात्म यामध्ये विशेष ओढा वाटेल. परदेश गमनाचे बेतही आखाल. संमिश्र दिवस असे आजचे फल आहे.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Horoscope
Todays Horoscope: वादविवाद टाळा, जबाबदाऱ्या वाढतील; 'या' राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com