Todays Horoscope: वादविवाद टाळा, जबाबदाऱ्या वाढतील; 'या' राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज

Dainik Rashi Bhavishya In Marathi: अनेकदा आपण आपल्या दिवसाची सुरूवात राशी भविष्य पाहून करतो. आज पाहू या, कोणत्या राशीत काय लिहिलंय.
Rashi Bhavishya
Today's Rashi Bhavishya 5 June 2024, Horoscope TodaySaam TV

आजचे पंचांग ५ जून २०२४

बुधवार दिनांक ५ जून २०२४. वैशाख कृष्ण चतुर्दशी. नक्षत्र - कृतिका. योग- सुकर्मा. करण - विष्टी. रास - वृषभ. दिनविशेष चतुर्दशी वर्ज्य.

मेष - पैशाला विशेष महत्त्व.

पैशाला विशेष महत्त्व द्या. पैसा आहे तर आयुष्यामध्ये मान आहे, आणि तो आपण मिळवायचा आहे. हात सडळ सैल सोडू नका. तर कंजूसपणाचा दिवस हेच आपले ब्रीदवाक्य ठेवा.

वृषभ - खरेदी कराल.

शुक्राचा अंमल असणारी आपली रास आहे. आज काही खास गोष्टी कराव्या असे वाटेल. जसे की खरेदी, स्वतःसाठी वेळ द्याल. स्वतःला सजवावे अशाही भावना येतील. अलंकार, कपडे, चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल.

मिथुन- वादविवाद करू नका.

विनाकारण डोक्यात राख घालून कोणाशी वादविवाद करू नका. ते टाळा. आपल्या वस्तू, मौल्यवान ऐवज यांची काळजी घ्या.

कर्क-छान दिवस.

आपली रास भावनिक आणि कोमल अशी रास आहे. त्यामुळे आज दुधात साखर म्हणजे जवळच्या परिचित जणांच्या भेटीगाठी होतील. स्नेहभोजनाचा आनंद लुटाल. दिवस छान आहे.

सिंह- कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढेल.

रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. भ्रमंती, भ्रमण याचा आजचा दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढेल.

कन्या- मनोबल छान राहील.

धार्मिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. मनोबल छान राहील. धर्मअध्यात्म याच्या काही गोष्टी इतरांना सांगाल. दिवस चांगला आहे.

तूळ- सावधान राहा.

आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. जुने दुखणे डोके वर काढतील. महत्त्वाचे कामे मुद्दाम आज गळ्यात घेऊ नका. काळ्या पैश्यापासून सावधान राहा.

वृश्चिक- जोडीदाराची अपेक्षित साथ.

जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. उत्साह उमेद वाढेल. कोर्टकचेरीचे निर्णय मनाप्रमाणे लागतील. व्यावसायिक जोडीदारापासून फायदा होईल.

Rashi Bhavishya
Horoscope Today : जून महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

धनू- स्वास्थ्य जपा.

आपल्या मतांवर ठाम राहाल. काही वेळेला अंदाज चुकू शकतील. प्रवासामध्ये अडचणी येतील. कामांमध्ये व्यत्यय, असा आजचा दिवस. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपा.

मकर- आर्थिक क्षेत्रात यश

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात यश आहे. कला मनोरंजन क्षेत्रात स्वतःला गुंतवून घ्याल.

कुंभ - नवीन मार्ग निवडा.

आयुष्य जगण्यासाठी थोड्या उत्साहाच्या गोष्टी असाव्या लागतात, म्हणून नवीन दिशा नवीन मार्ग निवडा. आपल्या आजूबाजूचे लोकांकडून सकारात्मकता मिळवण्याचा प्रयत्न करा.

मीन - जबाबदाऱ्या येतील.

महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊन पडतील. त्याचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. काही अंदाज मात्र अचूक ठरतील.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Rashi Bhavishya
Todays Horoscope: 'या' राशींवर होणार शनीदेवाची कृपा; प्रगतीचे नवे मार्ग मिळणार, तुमच्या राशीत काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com