Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला २३ वर्षांनंतर बनतोय एकादशीचा संयोग; जाणून घ्या पुजेचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Makar Sankranti Ekadashi rare conjunction: हिंदू पंचांगानुसार यंदा २३ वर्षांनंतर मकर संक्रांती आणि एकादशीचा दुर्मिळ संयोग होत आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्वाचा आहे.
Makar Sankranti Ekadashi rare conjunction
Makar Sankranti Ekadashi rare conjunctionsaam tv
Published On

या वर्षी सूर्यदेव 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. मकर संक्रांतीचा उत्सव याच दिवशी साजरा होणार आहे. यावेळी मकर संक्रांती अत्यंत खास ठरणार आहे, कारण जवळपास 23 वर्षांनंतर मकर संक्रांतीला एकादशीचा संयोग होतोय. या दिवशी षटतिला एकादशी आहे. यापूर्वी मकर संक्रांती आणि एकादशीचा असा संयोग सन 2003 मध्ये झाला होता. चला पाहूया, या संयोगात मकर संक्रांतीची पूजा कशी करावी.

मकर संक्रांतीवर दोन शुभ योग

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा ते उत्तरायण होतात. म्हणजेच या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेकडे गती करतो. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योगही निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांचा समावेश आहे. या योगांमुळे दान-पुण्य आणि पूजेचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं.

Makar Sankranti Ekadashi rare conjunction
Surya Mangal Yuti: 18 वर्षांनंतर बनणार सूर्य आणि मंगळाचा महासंयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त

  • पुण्यकाल- 14 जानेवारी, दुपारी 03:04 ते संध्याकाळी 05:57

  • महापुण्यकाल- दुपारी 03:04 ते 03:28

  • स्नान-दानाचा मुहूर्त- सकाळी 09:03 ते 10:48

मकर संक्रांतीची पूजेची पद्धती

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून पवित्र नदीत स्नान करावं किंवा घरात स्नान करावं. घरात स्नान करताना पाण्यात तिळांचा समावेश करणं शुभ मानण्यात येतं. स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातील पाणी अर्पण करावं. त्यात लाल फुलं, तीळ आणि अक्षता घालाव्या. या वेळी “ॐ सूर्याय नमः” किंवा “ॐ घृणि सूर्याय नमः” मंत्राचा जप करावा.

Makar Sankranti Ekadashi rare conjunction
Money rain zodiac: 100 वर्षांनी शुक्राने बनवले 3 राजयोग; 'या' राशींना मिळणार नवी नोकरी, धनलाभ होण्याची शक्यता

यंदाच्या संक्रांतीसोबत एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूची पूजा करणं आवश्यक आहे. त्यांना तिळापासून बनवलेले पदार्थ आणि फळांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर गरजूंना दान-दक्षिणा द्यावी.

Makar Sankranti Ekadashi rare conjunction
Mahalakshmi Rajyog: 18 महिन्यांनी मंगळ-चंद्र बनवणार महालक्ष्मी राजयोग; नव्या वर्षात या राशींची नोकरी-व्यवसायात होणार भरभराट

मकर संक्रांतीवरील दानाचं महत्त्व

षटतिला एकादशीच्या संयोगात आलेल्या या मकर संक्रांतीला काही विशेष वस्तूंचं दान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी अन्न, वस्त्र आणि धन यांसोबतच तीळ, गुळापासून बनवलेल्या वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं.

Makar Sankranti Ekadashi rare conjunction
Weekly Horoscope: या राशींच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com