Tejashree Walawalkar And Director Viren Pradhan Meet Photos
Tejashree Walawalkar And Director Viren Pradhan Meet PhotosSaam Tv

Tejashree Walawalkar New Look: ‘उंच माझा झोका’ मधील रमा इतकी बदलली की ओळखताही येईना; पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले...

Tejashree Walawalkar And Director Viren Pradhan Meet Photos: सध्या सोशल मीडियावर ‘उंच माझा झोका’च्या दिग्दर्शकांची आणि अभिनेत्री तेजश्री वालावलकरच्या भेटीची चर्चा तर होतच आहे, पण तिच्या लूकची देखील नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
Published on

Zee Marathi Serial Actress Latest Look: ‘उंच माझा झोका’ मालिकेतून रमाबाई रानडे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला २०१२- १३ मध्ये आली होती. मालिकेने प्रेक्षकांचे काही काळ मनोरंजन केल्यानंतर प्रेक्षकांची रजा घेतली. मलिकेप्रमाणे मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. अनेक वर्षांनंतर मालिकेतल्या रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या दिग्दर्शकांची आणि अभिनेत्री तेजश्री वालावलकरच्या भेटीची बरीच चर्चा होत आहे. अभिनेत्रीच्या सध्याच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

Tejashree Walawalkar And Director Viren Pradhan Meet Photos
Nawazuddin Siddiqui Haddi Film New Look: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार; दिग्दर्शकांसह निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

मालिकेतले सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्या मालिकेनंतर काही कलाकार प्रेक्षकांना सिनेसृष्टीत जास्त सक्रिय दिसले नव्हते. अशातच मालिकेतल्या कलाकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. कारण होतं एका कार्यक्रमाचं. मालिकेत रमा हे पात्र तेजश्री वालावलकर हिने साकारले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटातून किंवा मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. अभिनेत्री नेमकी काय करते?, कशी दिसते? याची चाहत्यांना फारच उत्सुकता होती. अखेर याचे उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. (Actress)

नुकताच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तेजश्रीची आणि मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची भेट झाली. या भेटीमध्ये तिच्यासोबत काढलेला सेल्फी दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शकांनी शेअर भेटी दरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “उंच माझा झोका मधली छोटी रमा आता मोठी झाली. दिवस भरभर मोठे होतात.” असं म्हणत फोटो शेअर केला आहे.

Tejashree Walawalkar And Director Viren Pradhan Meet Photos
Subhedar Trailer : राजं आधी लगीन कोंढाण्याचं... 'सुभेदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘उंच माझा झोका’ मालिकेबद्दल बोलायचे तर, मालिकेचे दिग्दर्शन विरेन प्रधान यांनी केलेलं आहे. मालिकेत प्रमुख भूमिकेत, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत अशी तगडी स्टारकास्ट होती.

मालिकेमध्ये तेजश्री वालावलकर हिने रमाबाई रानडे यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर मोठ्यापणातील रमाबाई रानडे यांचे पात्र स्पृहा जोशीने साकारले होते. मालिकेप्रमाणे मालिकेतील कलाकार देखील आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आले होते.

दिग्दर्शक विरेन प्रधान यांची पोस्ट पाहून चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सध्या काय करते ? असा प्रश्न उपस्थित केला आहे, तर काहींनी तिच्या लूकचे कौतुक देखील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com