पुणे : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा Akshay Kumar 'खिलाडीयो का खिलाडी' या चित्रपटाला गेल्या आठवड्यात २५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अक्षयने अंडरटेकरला Undertaker पराभूत केलेल्यांपैकी आपण एक असल्याचे सांगत एक गमातीशीर मिम Meme शेअर केला आहे. WWE Icon Undertaker Challenges Akshay Kumar to play in match ring
या चित्रपटात अक्षयचा अंडरटेकरविरुध्द संघर्षाचा सीन होता. त्याने त्यात अंडरटेकरला हरवले आणि शेवटी विजय मिळविला. अक्षयने त्या मिमवर स्पष्ट देखील केले होते की, चित्रपटात तो प्रत्यक्षात अंडरटेकर (मार्क कॅलवे) Mark Calvey नव्हता. अक्षयने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "एक मजेदार गोष्ट म्हणजे ते कुस्तीपटू ब्रायन ली Brian Lee होते ज्यांनी चित्रपटात अंडरटेकरची भूमिका केली होती."
विशेष म्हणजे अंडरटेकरने इंस्टाग्रामवर Instagram अक्षयच्या पोस्टवर कमेंट केले आहे. यात अंडरटेकरने अक्षयला पुन्हा खेळायला आव्हान केले. "हा ! आपण जेव्हा रीअल मॅचसाठी तयार असाल तेव्हा मला सांगा," यावर अक्षयने त्वरित प्रतिक्रिया देखील दिली. म्हणाला की, "मला माझा जीवन विमा तपासून परत येऊ दे, भावा!" अशी गमतीशीर जुगलबंदी दोघे करत होते.
त्यांच्या मजेदार जुगलबंदी नंतर वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटने WWE शुक्रवारी अक्षय आणि त्यांच्या दिग्गज फायटर यांच्यात सामन्याचा प्रस्तावही शुक्रवारी दिला. WWE Icon Undertaker Challenges Akshay Kumar to play in match ring
अंडरटेकरची भारतात सुद्धा प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याला डब्ल्यूडब्ल्यूई WWE विश्वातील एक महान आणि सर्वात आवडता पात्र म्हणून ओळखले जाते. 1990 मध्ये त्याने या विश्वात पदार्पण केले आणि तीन दशकांपर्यंत डब्ल्यूडब्ल्यूई रिंगवर वर्चस्व गाजवले.
दरम्यान, अक्षयने नुकतीच आपल्या बहुप्रतिक्षित स्पाय-थ्रिलर 'बेल बॉटम' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली. हा चित्रपट 27 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
ओटीटीच्या OOT व्यासपीठावर रिलीज झालेल्या 'लक्ष्मी' या चित्रपटात चाहत्यांनी अक्षयला पहिले होते . या चित्रपटांच्या रांगेत रोहित शेट्टी Rohit Shetty यांच्या 'सौर्यवंशी' यासह अनेक चित्रपट आहेत. त्याने सध्या 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटाचे शूट पूर्ण केले असून सध्या तो 'राम सेतु' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
नुकतेच अक्षय कुमारने जम्मू-काश्मीरमधील Jammu Kashmir शाळेच्या इमारतीसाठी 1 कोटी रुपयांची देणगी दिली; याला त्याचे वडील हरि ओम यांचे नाव देण्यात येणार आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.