Urfi Javed Humsafer
Urfi Javed HumsaferSaam Tv

Urfi Javed's Humsafar: अखेर ‘तो’ हो म्हणाला; उर्फीला लाईफ पार्टनर मिळाला

यावेळी उर्फी आपल्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
Published on

Urfi Javed News: कधी आपल्या फॅशनमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. नेहमीच कोणत्याही गोष्टींचा वापर करत फॅशन करणारी उर्फी आज सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी ती आपल्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Urfi Javed Humsafer
Kantara Movie Prequel: कांतारा 2 येणार? ऋषभ शेट्टीने दिली चित्रपटाविषयी मोठी अपडेट

आज सकाळी उर्फीने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे, त्या फोटोत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याची एक माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर उर्फीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. उर्फीने एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तिने टेबलवर फुलाचा गुच्छ ठेवला आहे, सोबतच एका कार्डवर ‘अखेर तो हा बोलला...’ (He Said Yes...) असं म्हणत फोटो शेअर केला आहे. यामुळे सोशल मीडियावर नक्की उर्फी कोणाच्या प्रेमाच पडली असा प्रश्न विचारत आहे..

नक्की ती कोणाच्या प्रेमात पडली आहे, असा सवाल तिच्या पोस्टमधून नेटकरी विचारत आहे. उर्फी जावेदने सध्या असं काही लिहिलेलं नाही, त्यामुळे ती रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी करू शकेल. एकाने लिहिले, ‘अभिनंदन’. तर एकाने लिहिले, ‘अखेर तिला लाईफ पार्टनर मिळाला, आता तरी ती सुधारेल’, तर एकाने लिहिले की ‘तो भाग्यवान मुलगा कोण आहे.’

Urfi Javed Humsafer
Aditya Roy Kapur: आदित्यने अनन्यासोबतच्या चर्चांवर मौन सोडले; ‘प्रत्येकजण लग्न करत आहे, परंतु...’ म्हणत केला महत्वाचा खुलासा

उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने टीव्ही शोमध्येही काम केले असून रिॲलिटी शोचा भाग देखील आहे. करण जोहरच्या बिग बॉस ओटीटीमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. लखनौमध्ये जन्मलेल्या उर्फी जावेदने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं असून सध्या ती इंडस्ट्री आणि फॅशन जगतात कायमच चर्चेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com