Aditya Roy Kapur And Ananya Pandey Relationship
Aditya Roy Kapur And Ananya Pandey RelationshipInstagram

Aditya Roy Kapur: आदित्यने अनन्यासोबतच्या चर्चांवर मौन सोडले; ‘प्रत्येकजण लग्न करत आहे, परंतु...’ म्हणत केला महत्वाचा खुलासा

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरु असून आणखी एक बॉलिवूडमधील क्यूट कपल लग्नगाठ बांधणार आहे. ती जोडी म्हणजे, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेची. नुकतंच आदित्यने त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले आहे.
Published on

Aditya Roy Kapur And Ananya Pandey Relationship: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाची लग्न सराई सुरू आहे. आथिया- राहुल, कियारा- सिद्धार्थ नंतर आणखी एक बॉलिवूडमधील सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर आता पर्यंत होत आली आहे. ती जोडी म्हणजे, अनन्या आणि आदित्य रॉय कपूर. आदित्य आणि अनन्या यांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली आहे. अशातच त्यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Aditya Roy Kapur And Ananya Pandey Relationship
Sushmita Sen: मोठ्या दुर्घटनेनंतर सुष्मिता कामावर परतली; 'ताली'चे डबिंग करत केला कामाचा श्री गणेशा

नुकताच अनन्याने आदित्यच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसीरिजच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. सोबतच त्यांनी लॅक्मे फॅशन वीकला एकत्र हजेरी लावली होती. सध्या त्यांचा रॅम्प वॉक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. हा रॅम्प वॉक व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पुन्हा एकदा रिलेशनशिपच्या चर्चा होत आहे.

नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान त्याला पत्रकारांनी काही प्रश्न विचारले त्यावेळी तो म्हणतो, ‘मला वाटतं की प्रत्येकजण लग्न करत आहे, परंतु माझा सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही. त्यामुळे, मी माझा सध्या वेळ घेत आहे, आणि योग्य वेळ आली की, लग्नाचा निर्णय घेईन.’

Aditya Roy Kapur And Ananya Pandey Relationship
Bheed Review: लॉकडाऊनची भीषण दाहकता दाखवणारा ‘भीड’; असा आहे चित्रपट

कॉफी विथ करण या शोमध्ये, करणने त्याच्या कार्यक्रमात अनन्या पांडेला विचारले होते, “मी तुला माझ्या पार्टीत पाहिले होते... तुझ्यात आणि आदित्य रॉय कपूरमध्ये काय संबंध आहे?” या प्रश्नावर अनन्याने उत्तर दिले की, “मला आदित्य रॉय कपूर आवडतो.”

लवकरच आदित्य राय कपूर मुख्य भूमिकेत असणारा ‘गुमराह’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आदित्य रॉय कपूरसोबतच मृणाल ठाकूर आणि रौनित रॉय देखील दिसणार आहे. वर्धन केळकर दिग्दर्शित चित्रपटात तमिळ भाषेतील ‘थडम’चा रिमेक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com