Bheed Review
Bheed ReviewSaam Tv

Bheed Review: लॉकडाऊनची भीषण दाहकता दाखवणारा ‘भीड’; असा आहे चित्रपट

चित्रपटात कोरोना काळातील त्या दाहकतेचा आज साधा विचार जरी केला, तरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आपल्या ‘भीड’ या चित्रपटाची कथा आणि काही मुद्दे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
Published on
Bheed Film(3 / 5)

Bheed Film Review: २०२० हे वर्ष जगभरातील प्रत्येक व्यक्तीला काही तरी वेगळी शिकवण देऊन गेलं. या वर्षात सर्वांनीच कोरोना व्हायरससोबत लढत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, काहींसाठी हा लढा यशस्वी ठरला तर काहींजण हे अयशस्वी ठरले. याच भयान वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘भीड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर आहे.

चित्रपटात कोरोना काळातील त्या दाहकतेचा आज साधा विचार जरी केला, तरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आपल्या ‘भीड’ या चित्रपटाची कथा आणि काही मुद्दे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मजुरांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पलायन, लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या शहरामध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीला घरी परत आणण्यासाठी आईची धडपड, डॉक्टर, पोलीस, काही राजकीय मंडळी आणि एक पत्रकार. या सर्व घटकांना पकडून या चित्रपटाची कथा आपल्याला दिसते.

Bheed Review
3 Idiots Sequel: क्या बात है..! 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार; खुद्द करीना कपूरने दिली माहिती

कोरोना काळात अनेक जण कर्मभूमी सोडून आपल्या मायभूमीत परतले. अनेकांना काही गोष्टींचा नाहक त्रास सहन करत लांबचा पल्ला गाठावा लागला होता. कोरोना व्हायरसमुळे सर्वच राज्यांच्या सीमा, जिल्हांच्या सीमा तसेच गाव आणि शहरातल्या सीमा देखील बंद करण्यात आला आहे.

दिया मिर्झाला दुसऱ्या शहरात शिकणाऱ्या मुलीला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. एक मुलगी तिच्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. इन्चार्जच्या भूमिकेत राजकुमार राव एकीकडे आपल्या पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्थेसह आपली माणुसकी दाखवतो, पण कुठेतरी त्याला प्रत्येक वेळी जातीयवादाचा सामना करावा लागतो.

Bheed Review
Akshay Kumar: अक्षयला शूटिंग दरम्यान दुखापत, टायगरसोबत ‘त्या’ सीनचं शूट करताना अपघात

डॉक्टरच्या भूमिकेत भूमी पेडणेकर पोलीस कर्मचारी राजकुमार रावच्या प्रेमात पडली आहे, पण त्यांच्या प्रेमाला जातीचे काही बंधन आडवे येताना दिसत आहे. पंकज कपूरही त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिकेत आहे. काहींना पोलिसांची नोकरी आणि माणुसकी यात संघर्ष होतोय, काहींना घरी जायचे आहे, काहींना त्यांच्या मुलाला आणायचे आहे तर काही जण आजारी वडिलांना काही वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे सायकलवर घेऊन डॉक्टरांकडे जायचे आहे. पण अशा परिस्थितीत जेव्हा सरकारकडून नागरिकांना मदत मिळत नाही म्हणून त्यांना सर्वाधिक राग येतो.

राजकुमार राव हे पोलिसाच्या भूमिकेत असून, भूमी पेडणेकर डॉक्टर आणि कृतिका कामरा महिला पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेत पंकज कपूर आणि पोलिस प्रमुख म्हणून आशुतोष राणा, असहाय्य आईच्या भूमिकेत दीया मिर्झा दिसत आहे. दिया मिर्झाचा ड्रायव्हर म्हणून सुशील पांडेचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.

प्रत्येकाने आपल्या अप्रतिम अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी आणि सोनाली जैन यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून अनुराग साहित्यच्या संगीताने चित्रपटाला आवश्यक असलेला ग्रामीण साज दिलेला आहे.

अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’ चित्रपटाच्या कथेला वेगळेच पैलू पाडले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे सीन्स पाहून नक्कीच तुमचे ही डोळे पाणावतील. चित्रपटातील अनेक संवाद हृदयाला भिडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com