Akshay Kumar: अक्षयला शूटिंग दरम्यान दुखापत, टायगरसोबत ‘त्या’ सीनचं शूट करताना अपघात

अक्षय कुमार स्कॉटलंडमध्ये शूटिंग करत असताना जखमी झाला आहे.
Akshay Kumar Injured
Akshay Kumar InjuredSaam Tv

Akshay Kumar Injured: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपट बरेच चर्चेत आहेत. अक्षय कुमारही नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर सक्रिय असतो. अशातच अक्षय कुमार चित्रपटांमध्ये धडकेबाज स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या सेटवर ॲक्शन सीन करताना जखमी झाला आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात तो अभिनेता टायगर श्रॉफसोबत आहे. अभिनेता स्कॉटलंडमध्ये शूटिंग करत असताना जखमी झाला. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला फारशी गंभीर दुखापत झाली नसल्याने शूटिंग कायम सुरु ठेवणार आहे.

Akshay Kumar Injured
Pradeep Sarkar: बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, “अक्षय कुमार टायगरसोबत ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता, त्या दरम्यान अक्षयला एक स्टंट करताना ही दुखापत झाल्याचे कळत आहे. त्याच्या गुडघ्यावर सध्या ब्रेसेस आहेत.” परदेशातील शूटिंग वेळात पूर्ण व्हावे यासाठी अक्षय क्लोज-अप्ससह शूट करत आहे. मात्र सध्या शूटचा महत्वाचा ॲक्शन भाग थांबवण्यात आला आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगरसोबतच सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शूटिंगसाठी स्कॉटलंडला रवाना होण्यापूर्वी टीमने मुंबईत त्यांच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘गुंडे’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Akshay Kumar Injured
United Kacche Trailer: सुनील ग्रोव्हर पुन्हा येतोय.. नवी वेबसिरीज 'युनायटेड कच्चे'.. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

‘बडे मियाँ छोटे मियाँ’हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, गोविंदा यांनी डबल रोल केला होता. सोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं होतं. त्या चित्रपटाने तेव्हा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेन्स येत आहे. यामध्येच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com