3 Idiots Sequel: क्या बात है..! 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार; खुद्द करीना कपूरने दिली माहिती

Kareena Kapoor Announce Movie Sequel: सुप्रसिद्ध आणि गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येणार.
3 Idiots Sequel
3 Idiots SequelSaam TV
Published On

Kareena Kapoor Video: अभिनेत्री करीना कपूर मोठा खुलासा केला आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर करत महत्त्वाची माहिती नेटकऱ्यांना सांगितली आहे. व्हिडिओच्या मध्यातून तिने शेअर केलेली माहिती एका आगामी चित्रपटाविषयी आहे.

करीना या चित्रपटामध्ये 'थ्री इडियट्स' या चित्रपटाविषयी सांगत आहे. आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला होता. फुंसुक वांगडू या पात्राभोवती फिरते. आता या सुप्रसिद्ध आणि गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येणार असे करीना सांगत आहे.

3 Idiots Sequel
Pradeep Sarkar Passed Away: बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

पाहूया काय म्हणतेय करीना या व्हिडिओमध्ये. मी जेव्हा सुट्टीवर होते तेव्हा या तिघांचे काहीतरी शिजत होते. माझ्यापासून या तिघांनी काहीतरी लपवले आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सची क्लिप सगळीकडे फिरत आहे. काहीतरी शिजतंय. तुम्ही असं समजू नका कि मी शरमनच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

ते 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल करणार आहेत. फक्त हे तिघे, माझ्याशिवाय कसं करतायेत. मला वाटत बमनला देखील याविषयी माहित नाही. मी आता बमनला फोन करून चेक करते, नेमकं काय चालू आहे ते? काहीतरी नक्कीच सुरू आहे, याची मला खात्री आहे.

थ्री इडियट्स हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्याव्यतिरिक्त बमन इरानी, करीना कपूर, मोना सिंह इत्यादी कलाकार होते. या चित्रपटामध्ये एक सामाजिक विषयवार भाष्य केले होते. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार हे ऐकून चाहते खूप आनंदित झाले आहेत. या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि नवीन काहीतरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com