Lek Asavi Tar Ashi: 'लेक असावी तर अशी'मध्ये नव्या-जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ, स्टारकास्टची नावं आली समोर

Lek Asavi Tar Ashi Movie: ३४ वर्षानंतर विजय कोंडके 'लेक असावी तर अशी' (Lek Asavi Tar Ashi Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये कोण-कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.
Lek Asavi Tar Ashi Starcast
Lek Asavi Tar Ashi Starcast Saam Tv

Lek Asavi Tar Ashi Starcast:

ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके (Vijay Kondke) यांचं नाव घेतल्यानंतर लगेच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे 'माहेरची साडी' (Maherchi Saree) हा चित्रपट. १९९१ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट सुपहिट ठरला होता. या चित्रपटाने बक्कळ कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले होते. आता तब्बल ३४ वर्षानंतर विजय कोंडके 'लेक असावी तर अशी' (Lek Asavi Tar Ashi Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये कोण-कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. अशामध्ये या चित्रपटाच्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.

विजय कोंडके यांनी नव्या-जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ 'लेक असावी तर अशी' या चित्रपटाच्या निमित्ताने घातला आहे. या चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्यकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. यांच्यासोबत गार्गी दातार हा नवा चेहरा या चित्रपटाचत झळकणार आहे. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला रिलीज होणार आहे.

Lek Asavi Tar Ashi Starcast
Pushpa 2 The Rule Teaser: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'पुष्पा 2'चा टीझर कसा असेल? समोर आले आपडेट

'लेक असावी तर अशी' या चित्रपटातून दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विनोदी भूमिका ताकदीने साकारण्याचं कौशल्य नयना आपटे, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने यांच्याकडे आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आबालवृद्धांना आपल्या अभिनयशैलीने मोहिनी घालण्याचं कसब सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्यकर यांच्याकडे आहे.

Lek Asavi Tar Ashi Starcast
Shehnaaz Gill चं रोमँटिक गाणं 'Dhup Lagdi' चा टीझर आऊट, पोस्ट करत अभिनेत्रीने सांगितली रिलीज डेट

मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेता कमलेश सावंत, विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या सुरेखा कुडचीहे सर्व विजय कोंडके यांनी 'लेक असावी तर अशी' या कौटुंबिक कलाकृतीच्या माध्यमातून केलं आहे. प्रेमाचा आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा 'लेक असावी तर अशी' चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Lek Asavi Tar Ashi Starcast
Bade Miyan Chote Miyan Movie: प्रतीक्षा संपली! 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, अक्षय कुमार- टायगर श्रॉफमध्ये पुन्हा भांडण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com