Shehnaaz Gill Romantic Song
Shehnaaz Gill Romantic SongSaam Tv

Shehnaaz Gill चं रोमँटिक गाणं 'Dhup Lagdi' चा टीझर आऊट, पोस्ट करत अभिनेत्रीने सांगितली रिलीज डेट

Shehnaaz Gill Romantic Song: शहनाज गिलने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. अशामध्ये शहनाज गिल सध्या चर्चेत आली आहे त्यामागचे कारण म्हणजे तिचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhup Lagdi Song:

'बिग बॉस 13' मधून प्रसिद्धी मिळवलेल्या पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिलला (Shehnaaz Gill) सध्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. शहनाज गिलने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. अशामध्ये शहनाज गिल सध्या चर्चेत आली आहे त्यामागचे कारण म्हणजे तिचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शहनाजच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. शहनाजचे 'धूप लगदी' हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्यासंदर्भात शहजानने पोस्ट केली आहे.

'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली शहनाज गिल बॉलिवूड अभिनेता सनी सिंगसोबत एक रोमँटिक गाणं घेऊन आली आहे. या गाण्याचे नाव 'धूप लगदी' असे आहे. या गाण्याचा टीझर शहनाज गिलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे गाणं स्वतः शहनाजने गायले असून अनिकेत शुक्लाने संगीत दिले आहे. हे गाणं ८ एप्रिल रोजी 11 वाजता प्रदर्शित होणार आहे.

या गाण्यात शहनाज गिलचा साधा लूक पाहायला मिळत आहे. या गाण्यात सनी सिंग आणि शहनाज यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. एका कमी उत्पन्नाच्या गावातील जोडप्याची भूमिका या दोघांनी साकारली आहे. जे पैशाने श्रीमंत नसले तरी एकमेकांच्या प्रेमाने श्रीमंत आहेत.

शहनाज गिलने पंजाबी इंडस्ट्रीत आपले टॅलेंट दाखवल्यानंतर बॉलिवूड आणि आता ओटीटीवरही देखील तिने आपले टॅलेंट दाखवले आहे. शहनाजने गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.'पंजाबची कतरिना' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल 'पटना शुक्ला' चित्रपटात रवीना टंडनचा आवाज बनली आहे. तिने 'पटना शुक्ला' चित्रपटात एक गाणे गायले आहे. ज्याद्वारे तिने बॉलिवूडमध्ये सिंगर म्हणून पदार्पण केले आहे.शहनाज गिलने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

Shehnaaz Gill Romantic Song
Pushpa 2 The Rule Teaser: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'पुष्पा 2'चा टीझर कसा असेल? समोर आले आपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com