Vijay Deverakonda: अर्जुन रेड्डी कायद्याच्या कचाट्यात अडकला; आदिवासी समाजाचा अपमान करणे पडलं महागात

Vijay Deverakonda: दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या एका वादात अडकला आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमात आदिवासी समाजाविषयी दिलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Vijay Deverakonda
Vijay DeverakondaSaam Tv
Published On

Vijay Deverakonda: दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या एका वादात अडकला आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमात आदिवासी समाजाविषयी दिलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, विविध संघटनांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ही घटना विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान घडली. या कार्यक्रमात विजय देवरकोंडाने देशाच्या सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले आणि त्याची तुलना ५०० वर्षांपूर्वीच्या आदिवासी संघर्षाशी केली. आदिवासींनी आरोप केला आहे की अशा विधानांमुळे त्यांचा अपमान झाला आहे आणि अभिनेत्याने त्वरित माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Vijay Deverakonda
Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' ची दमदार सुरुवात; अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केला १० मोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक

तक्रारीनुसार, विजय देवरकोंडाने वापरलेली भाषा ही जातीय द्वेष निर्माण करणारी असून, ती आदिवासी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे असे काही समुदायांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली असून, अभिनेता माफी मागेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Vijay Deverakonda
Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' ची दमदार सुरुवात; अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केला १० मोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान, विजय देवरकोंडा लवकरच 'किंगडम' या चित्रपटात झळकणार आहे. पण या चित्रपटाच्या तथापि, 'हृदयम लोप्पला' या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री बोर्शे सोबत दिसणारा आहे. विजयचा हा चित्रपट अॅक्शन ड्रामामध्ये विजयसोबत रोमान्स असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com