
इंडस्ट्रीतील पावरफुल कपल म्हणून अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्याकडे पाहिले जाते. चित्रपटातील या दोघांच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय दोघेही कायमच कोणत्या ना कोणत्या कारमामुळे चर्चेत राहतात. अनेकदा या दोघांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या. मात्र कधीही दोघांनी नात्याची पुष्टी दिली नाही. नुकतंच या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यावरून लवकरच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लग्न करतील असं म्हटल जात आहे.
विजय आणि रश्मिका यांचा साखरपुडा झाला?
विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या साखरपुड्याबद्दलच्या चर्चांवर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यावरून या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, रश्मिका तयार होताना दिसतेय. पाहुणे मंडळी दिसत आहे.
व्हायरल फोटो अन् व्हिडीओमुळे झाला खुलासा?
रश्मिका आणि विजय यांचा वधू-वराच्या अंदाजातील सजलेला एक फोटोही समोर आला आहे, ज्यामुळे खरच खऱ्या आयुष्यात हे दोघेही एकत्र दिसणार का, यांचा साखरपुडा आहे का? असे प्रश्न समोर आले आहेत.मात्र स्वत: रश्मिका किंवा विजय दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याबद्दल सोशल मीडियावर अद्याप कोणतेही फोटो पोस्ट केलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेली व्हिडीओ त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नाही तर त्यांच्या रील लाईफमधील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप, ज्यामध्ये रश्मिका आणि विजय वधू-वराच्या भूमिकेत आहेत, ते प्रत्यक्षात त्यांच्या 'गीता गोविंदम' चित्रपटातील आहे, जिथे या जोडप्याने चित्रपटाच्या कथानकानुसार लग्न केले.
फेब्रुवारी २०२६ मध्ये अडकणार लग्नबंधनात?
मिडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला होता की, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी लग्न केले असल्याची माहिती आहे. हैदराबादमध्ये त्यांचा एक अतिशय जवळचा संमारभ झाला. ज्यामध्ये या दोघांच्याही जवळचे कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. सोशल मीडियावर या दोघांनीही नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. अनेकदा या दोघांच्या डेंटिंगच्या चर्चा रंगल्या. प्रेक्षकांना या दोघांच्या केमेस्ट्री पसंत पडली आहे. दोघांनी त्यांचा पहिला चित्रपट 'गीता गोविंदम' च्या चित्रीकरणादरम्यान डेटिंग सुरू केली. त्यांच्या सारख्याच फोटोंमुळे लोकांना असे वाटू लागले की ते एकत्र सुट्टीवर आहेत मात्र या दोघांनीही नात्यावर काहीच भाष्य केले नाही.
डेक्कन क्रॉनिकलच्या एका वृत्तानुसार, विजय आणि रश्मिका हे ३ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. सध्या तरी याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही, कारण अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की दोन्ही कलाकारांचे काही प्रोजेक्ट आहेत. ज्यामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले जाऊ शकते. वृत्तानुसार, विजय आणि रश्मिका त्यांच्या तिसऱ्या चित्रपटावर एकत्र काम करत असताना लग्न करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.