Vicky Kaushal: 'छावा' बनला जादूगर ; विकी कौशलच्या 'एक जादूगर' चित्रपटाची पहिली झलक समोर

vicky kaushal New Movie: विकी कौशल छावाच्या यशानंतर लवकरच आपल्या आगामी 'एक जादूगर' या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे.
Vicky Kaushal  Ek Jadugar
Vicky Kaushal Ek Jadugar Saam Tv
Published On

vicky kaushal New Movie: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावातील कामामुळे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आता विकी लवकरच आपल्या आगामी 'एक जादूगर' या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार करत आहेत. पहिल्या लुकमध्ये विकी कौशल एका जादूगाराच्या भूमिकेत दिसत आहे,

या पोस्टरच्या लुकमध्ये विकीने गडद हिरव्या रंगाचा व्हेल्वेट सूट, आकर्षक हॅट आणि हातात चमकणारी जादूची कांडी धरून उभा आहे. त्याचा हा लुक जॉनी डेपच्या 'मॅड हॅटर' पात्राची आठवण करून देतो. ​हा पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चाहते विविध कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले तू सेलिब्रिटीपेक्षा एक अभिनेता आहे. एका चाहत्याने लिहिले तुझ्यासाख्या कलाकारांची बॉलीवूडला गरज आहे.

Vicky Kaushal  Ek Jadugar
Indian Idol 15 Winner: अनिरुद्ध उचलणार 'इंडियन आयडॉल 15'ची ट्रॉफी? रनरअपला आधीच लागला मोठा जॅकपॉट

​'एक जादूगर' या चित्रपटात विकी कौशलच्या नव्या भूमिकेची झलक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. तसेच, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Vicky Kaushal  Ek Jadugar
Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसला मातृ शोक; लीलावती रुग्णालयात आईने घेतला अखेरचा श्वास

तर, विकी कौशल सध्या 'छावा' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. तसेच, त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाचाही समावेश आहे, जो 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com