
Indian Idol 15 Winner: 'इंडियन आयडॉल 15' च्या ग्रँड फिनालेमध्ये अनिरुद्ध सुस्वरमने विजेतेपद पटकावेल अशी चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत माणसी घोष, स्नेहा शंकर आणि अनिरुद्ध सुस्वरम यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. अनिरुद्धच्या उत्कृष्ट गायन कौशल्यामुळे तो 'इंडियन आयडॉल 15' हा किताब जिंकेल अशा गप्पा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
अनिरुद्ध सुस्वरम हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहे. त्याने आपल्या सुरेल आवाजाने आणि उत्तम सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या गायनातील विविधतेमुळे तो सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि परीक्षकांचा आवडता स्पर्धक ठरला होता.
माणसी घोष आणि स्नेहा शंकर यांनी देखील आपल्या गायनाने प्रक्षकांना मंत्रमुग्ध केले. माणसीने 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' आणि 'द ब्रेकअप सॉन्ग' या गाण्यांवर अप्रतिम परफॉर्मन्स दिला, तर स्नेहाने 'तुझे याद ना मेरी आई' या गाण्याने प्रेक्षकांना भावूक केले. त्यांच्या या सादरीकरणांमुळे त्यांची अंतिम फेरीत निवड झाली. विशेष म्हणजे या सिझनची स्नेहा रनरअप होऊनही तिला एक विशेष संधी मिळाली. अंतिम फेरीच्या आधी, स्नेहा शंकरला भूषण कुमार यांच्याकडून त्यांच्या प्रसिद्ध लेबलसाठी गाण्याची संधी मिळाली.
ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुणे म्हणून रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि मिका सिंग उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले आणि आपल्या खास परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सिजनमध्ये स्पर्धकांनी विविध आव्हानांचा सामना करत उत्कृष्ट गायन सादर केले, त्यामुळे 'इंडियन आयडॉल 15' हा सिजन प्रेक्षकांच्या स्मरणात राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.