

15 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते.
‘वेलकम’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांमध्ये शानदार अभिनय केला होता.
मुश्ताक खान यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा
चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. 'वेलकम', 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम हैं राही प्यार के' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मुश्ताक खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुश्ताक खान यांना गेल्या १५ दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना सुमारे पाच वर्षांपूर्वी या आजाराचे निदान झाले होते, परंतु अलीकडेच तो पुन्हा बळावला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. मुश्ताक खान यांचे व्यावसायिक भागीदार शिवम यांनी मुश्ताक खान यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मुश्ताक खान यांच्या निधनाच्या बातमीमुळे चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मुश्ताक खान यांनी प्रामुख्याने सहाय्यक आणि विनोदी भूमिकांद्वारे चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. 'वेलकम' (Welcome) या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. याव्यतिरिक्त, 'आशिकी' (Aashiqui), 'मुझसे शादी करोगी' (Mujhse Shaadi Karogi) आणि 'हम हैं राही प्यार के' (Hum Hain Rahi Pyar Ke) यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयानेही त्यांनी आपली छाप पाडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.