Veen Doghatli Hi Tutena: संवाद नाही, तरीही भावना पोहोचणार! 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये रंगणार नो-डायलॉग एपिसोड

Veen Doghatli Hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत संवादांशिवाय विशेष भाग दाखवला जाणार आहे. झी मराठीच्या या अनोख्या प्रयोगाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
Veen Doghatli Hi Tutena No Dialogue Episode
Veen Doghatli Hi Tutena No Dialogue EpisodeSaam Tv
Published On

Veen Doghatli Hi Tutena: मराठी टेलिव्हिजन विश्वात सातत्याने नव्या मालिका आणि वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक कायम काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच 'वीण दोघातली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेने एक वेगळाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचा आगामी भाग पूर्णपणे संवादविरहित असणार असून, या संकल्पनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सामान्यपणे मालिकांमध्ये पात्रांचे संवाद हे कथानक पुढे नेण्याचं महत्त्वाचं माध्यम असतं. अनेक प्रेक्षक घरातील कामे करतानाही मालिका फक्त ऐकत असतात. त्यामुळे संवादांना विशेष महत्त्व असतं. मात्र, 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेच्या आगामी भागात कोणत्याही पात्राचा एकही संवाद ऐकायला मिळणार नाही. पात्रांच्या भावना, हावभाव, अभिनय आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून संपूर्ण भाग उलगडणार आहे.

Veen Doghatli Hi Tutena No Dialogue Episode
Actor Death: मनोरंजनविश्वातील आणखी एक तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

या प्रयोगाविषयी बोलताना मालिकेचे निर्माता हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, टीव्ही माध्यमातही वेगवेगळे प्रयोग होणं आवश्यक आहे. "मालिका म्हणजे ठरावीक नाट्य आणि संवाद एवढ्यापुरती मर्यादित राहू नये. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात मूक चित्रपटांपासून झाली होती. त्याच संकल्पनेतून प्रेरणा घेत हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला," असे त्यांनी सांगितले.

Veen Doghatli Hi Tutena No Dialogue Episode
Jana Nayagan: विजय थलापती यांच्या 'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार

त्यांनी पुढे सांगितले की, झी मराठी वाहिनीने संवादांशिवाय भाग करण्याची कल्पना मांडली होती. त्यानुसार मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी हा विशेष भाग लिहिला. या भागात फक्त आवश्यक तेवढे साऊंड इफेक्ट्स ऐकू येतील. मात्र, पात्रांमध्ये कोणतेही संवाद नसतील.

दरम्यान, मालिकेतील स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील गोड क्षण, कुटुंबातील भावनिक प्रसंग आणि कथानकातील नवनवीन वळणांमुळे 'वीण दोघातली ही तुटेना' प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. मुख्य कलाकारांसह सहाय्यक कलाकारांच्याही अभिनयाचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मालिकेचे प्रोमो आणि सीन मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, आगामी संवादविरहित भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com