
कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला 'स ला ते स ला ना ते' हा 'नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट' अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकरांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सायकल सफरीनं झाली.
अभिनेत्री छाया कदम अभिनेता साईंकित कामत, रिचा अग्निहोत्री, पद्मनाभ बिंड, रमेश चांदणे, निर्माता- दिग्दर्शक संतोष कोल्हे, पटकथा आणि संवाद लेखक श्रीकांत बोजेवर, प्लाटून वन डिस्ट्रिब्यूटरचे शिलादित्य बोरा आणि अन्य तंत्रज्ञ सायकल सफर करत टायगर सफारीपर्यंत पोहोचले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात पोस्टर लॉंचचा सोहळा पार पडला. त्यानंतर सगळ्यानी टायगर सफारीचा आनंद घेतला. सोहळ्यासाठी, सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी प्रवासी भटक्याची वेशभूषा केली होती.
न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरव्यागार वनराईतून जाणारा रस्ता दिसतो. त्यामुळे प्रेमकथेसह पर्यावरणाशी संबंधित ही गोष्ट असल्याचा अंदाज बांधता येतो. पण 'स ला ते स ला ना ते' असं या चित्रपटाचं नाव का आहे, या प्रश्नाचं उत्तर ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहातच मिळणार आहे.
स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन तर श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे. 'स ला ते स ला ना ते' हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरूपा करमरकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.