Top Bollywood Songs 2024: 'आज की रात...' कोणत्या गाण्यावर प्रेक्षक जबरदस्त थिरकले? बॉलिवूडमधील टॉप ५ गाणी

Top Bollywood Songs List 2024 : यंदा चित्रपटांसोबत त्यांची गाणी देखील विशेष सुपरहिट ठरली. कोणत्या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले जाणून घेऊयात.
Top Bollywood Songs List 2024
Top Hit Bollywood Songs 2024SAAM TV
Published On

कोणताही चित्रपट गाण्याशिवाय अपुरा असतो. चित्रपटातील गाणी चित्रपटाची शोभा वाढवतात. तसेच प्रेक्षकांना चित्रपटाशी कनेक्ट ठेवतात. 2024 अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील काही हिट तर फ्लॉप ठरले. मात्र त्यांची गाणी सुपरहिट झाली. मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मध्ये सुपरहिट (Top Hit Bollywood Songs 2024) ठरलेली बॉलिवूड गाणी जाणून घेऊयात.

टॉप 5 बॉलिवूड गाणी

आज की रात

'आज की रात' हे गाणे 'स्त्री २' चित्रपटातील आहे. या गाण्यावर तमन्ना भाटियाने जबरदस्त डान्स केला आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील तुफान व्हायरल होत आहेत. 'स्त्री २' चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 'आज की रात' हे गाणे प्रेक्षकांना खेळवून ठेवते. 'स्त्री २' हा चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे.

तरस

'तरस' हे गाणे मुंज्या चित्रपटातील आहे. 'तरस'या गाण्यात शर्वरी वाघच्या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. तिने दमदार डान्स केला आहे. सोशल मीडियावर देखील तिच्याच गाण्याची चर्चा पाहायला मिळते. दमदार बीट्स आणि जबरदस्त व्हिज्युअलने हे गाणे सुपरहिट ठरले आहे.

तू है तो

'मिस्टर आणि मिसेस माही' या चित्रपटातील 'तू है तो' या गाण्याने तर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 'मिस्टर आणि मिसेस माही' या चित्रपटात प्रेम, लग्न आणि भावना यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. 'मिस्टर आणि मिसेस माही' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्यातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

खूबसूरत

'खूबसूरत' हे 'स्त्री २' या चित्रपटातील गाणे आहे. या गाण्यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले आहे. 'स्त्री २' हा हॉरर- कॉमेडी चित्रपट आहे. 'स्त्री २'मुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरला खूप लोकप्रियता मिळाली. आज ही मोठ्या प्रमाणात या गाण्यावर सोशल मीडियावर रील बनवल्या जातात.

हान के हान

'हान के हान' हे 'महाराज' चित्रपटातील गाणे आहे. हे गाणे मोनाली ठाकुरने गायले आहे. तिच्या मनमोहक आवाजाने हे गाणे सुपरहिट झाले.

Top Bollywood Songs List 2024
Top 10 Web Series List : घरबसल्या कोणी जिंकले प्रेक्षकांचे मन? २०२४ मधील टॉप १० वेब सीरिजची यादी पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com