मुंबई : मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटातही आपले नाव अग्रस्थानी ठेवणारा कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी(Atul kulkarni). एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपट अतुलने त्याच्या चाहत्यांना दिले आहेत. आज म्हणजेच १० सप्टेंबरला अतुल कुलकर्णीचा वाढदिवस(Birthday). अतुलचा जन्म कर्नाटकात झाला असून, अतुल रुपेरी पडद्यावर त्याची प्रत्येक भूमिका उत्कृष्टरित्या पार पडतो. त्याने मराठी चित्रपटसष्टीसोबत हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि इंग्रजी सिनेमामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
अतुल कुलकर्णींने आपले शालेय शिक्षण कर्नाटकात पूर्ण करत इयत्ता दहावीत असताना अभिनयात हात आजमवला. महाविद्यालयात असताना रंगभूमीवर प्रवेश करत आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. कन्नड चित्रपट 'भूमी गीता'तून त्याने १९९७ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर २००० साली 'हे राम' चित्रपटात त्याने काम केले. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून १९९५ साली नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा पूर्ण केला.
अतुल कुलकर्णीने 'चांदनी बार' आणि 'हे राम'या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चांदनी बार'चित्रपटातून त्यांनी मराठी प्रेक्षकच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषिक प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केले. त्यानंतर 'रंग दे बसंती','पेज ३','द अटॅक ऑफ २६\११', 'द गाझी अटॅक', 'थर्स्डे' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपटात अतुलने काम केले.
सिनेमातील यशासोबतच, अतुल कुलकर्णी यांनी २०१८ मध्ये 'द टेस्ट केस' या वेबसीरीजमधून ओटीटीवर पदार्पण केले होते. नंतर 'सिटी ऑफ ड्रिम्स','बंदिश बॅण्डिट्स','रुद्र: द इज ऑफ डार्कनेस' यांसारख्या दर्जेदार वेबसीरीजमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच बॉयकॉट ट्रेंडचा बळी पडलेला बॉलिवूडचा बहुचर्चित 'लाल सिंह चढ्ढा'चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाची अतुल कुलकर्णी पटकथा लिहीली होती. परंतू बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला म्हणावा तितका गल्ला जमवता आला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.