अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनना यांचा 'गणपत' हा चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील हे दोन्ही कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिजी आहेत.
'बिग बॉस १७'च्या वीकेंड वारमध्ये क्रिती आणि टायगर यांनी हजेरी लावली होती. या शोच्या सेटवर या दोघांनी भरपूर धमाल केली. या शोनंतर टायगर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टायगर श्रॉफ आणि त्याच्या 'गणपत' चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी यांनी एकत्र प्रवास केला आहे. त्यांचा या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण टायगर आणि जॅकी यांनी आलिशान कारने एकत्र प्रवास न करत चक्क मुंबई मेट्रो गाठली आहे. (Latest Entertainment News)
या मेट्रो राईड दरम्यान टायगरच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेले. यावेळी टायगरने व्हाईट शर्ट घातला होता. त्याच्या शर्टची वरची दोन बटणे उघडी होती. ब्लॅक पॅन्ट आणि डोळ्यांना गॉगल लवेलला टायगर डॅपर दिसत होता. तर जॅकी भगनानी ऑल ब्लॅक लूकमध्ये होता.
सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम आहे. तसेच 'गणपत' चित्रपटाचे प्रमोशन देखील सुरू आहे. दरम्यान टायगर आणि जॅकी एका नवरात्र मंडळाला भेट देण्यासाठी जात होते. मुंबईतील ट्राफिकपासून वाचण्यासाठी या दोघांनी मेट्रोचा पर्याय निवडला. टायगर आणि जॅकी या व्हिडीओमध्ये दोघेही गप्पा मारताना दिसत आहेत.
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे मत व्यक्त करायला सुरुवात केली. 'मेट्रोने प्रवास ट्रेंड झाला आहे', 'चित्रपट आला की करा मेट्रोने प्रवास', 'हृतिक रोशनला कॉपी करत आहेत हे लोक' अशा अनेक कमेंट नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी हृतिक रोशनने देखील मेट्रोने प्रवास केला होता. त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती शेअर केली होती. हृतिकने मेट्रोमधील फॅन्ससोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.